Pramod Nana Bhangire | शिवसेना महापालिका प्रशासनाला घेरणार | अल्टिमेटम देऊनही कामे पूर्ण न झाल्याने हजारोंच्या संख्येने केले जाणार आंदोलन | प्रमोद नाना भानगिरे

Homeadministrative

Pramod Nana Bhangire | शिवसेना महापालिका प्रशासनाला घेरणार | अल्टिमेटम देऊनही कामे पूर्ण न झाल्याने हजारोंच्या संख्येने केले जाणार आंदोलन | प्रमोद नाना भानगिरे

Ganesh Kumar Mule Jul 07, 2025 8:13 PM

Pune Helmet News | शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक | नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; सेवा पुस्तकातही होणार नोंद
MLA Sunil Tingre | पुण्यातील तीनपट कराबाबत लोकहिताचा निर्णय घेणार | उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन | आमदार सुनील टिंगरे यांनी उपस्थित केला होता मुद्दा
Indefinite strike | Sunil Shinde | कंत्राटी कामगाराच्या विविध मागण्यासाठी 18 पासून बेमुदत धरणे आंदोलन  | राष्ट्रीय मजदूर संघाचा आक्रमक पवित्रा 

Pramod Nana Bhangire | शिवसेना महापालिका प्रशासनाला घेरणार | अल्टिमेटम देऊनही कामे पूर्ण न झाल्याने हजारोंच्या संख्येने केले जाणार आंदोलन | प्रमोद नाना भानगिरे

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरात मूलभूत समस्याची कमतरता आहे. यामध्ये रस्त्यातील खड्डे, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, स्वच्छता कर्मचारी यांची बेफिकिरी याचा समावेश आहे. याबाबत शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रशासनाला लेखी तक्रारी केल्या होत्या. शिवाय प्रशासनाला अल्टिमेटम देखील दिला होता. तरीही प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही न झाल्याने आता हजारोंच्या संख्येने महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली. (Pune Shivsena)

नागरिकांच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारीनंतर शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने शहरात मूलभूत समस्या जाणून घेण्यासाठी पाहणी करण्यात आली होती. या दौऱ्यात ड्रेनेज व्यवस्थेतील अत्यंत गंभीर त्रुटी समोर आल्या असून, प्रदूषित सांडपाणी व पिण्याच्या नळाच्या पाण्याचे मिश्रण होण्याचे अनेक ठिकाणी वास्तव उघडकीस आले आहे. यावेळी शहरातील विविध भागांमध्ये पाहणी करण्यात आली होती.

या संदर्भात पुणे महानगरपालिका प्रशासनाला यापूर्वीही वेळोवेळी लेखी स्वरूपात लक्ष वेधण्यात आले होते. मात्र आजवर फारशा ठोस कृतीचा अभाव जाणवत असून, नागरिक आरोग्याच्या मोठ्या संकटात सापडले आहेत. साचलेले सांडपाणी, बंद नाले, उघड्या गटारी आणि त्यातून पसरणारा दुर्गंधीयुक्त व विषारी प्रवाह यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यावर असेलेले अतिक्रमण आणि यामुळे नागरिकांना होणारा त्रास त्यामुळे प्रशासनाला अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने शिवसेना आता आक्रमक झाली आहे.

य प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “शहरातील मूलभूत समस्या अजून तशाच आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आमच्या पाहणीत हे देखील आढळून आले होते की, स्वच्छता कर्मचारी हजर नसताना देखील त्यांची हजेरी लावली जाते. हा भ्रष्टाचार उघड करून आम्ही यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र यावर काही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आता आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: