Pramod Bhangire | प्रभाग ४१ चे टँकरमुक्तीच्या दिशेने ठोस पाऊल | प्रमोद नाना भानगिरे यांच्या पाठपुराव्या नंतर प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन 

Homeadministrative

Pramod Bhangire | प्रभाग ४१ चे टँकरमुक्तीच्या दिशेने ठोस पाऊल | प्रमोद नाना भानगिरे यांच्या पाठपुराव्या नंतर प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन 

Ganesh Kumar Mule Feb 17, 2026 6:44 PM

PMC Health Department | हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचे लसीकरण | सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ. राजेश दिघे
NCP-SCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात साजरा होणार | पुणे महानगरपालिकेवर पक्षाचा झेंडा फडकेल असा शहर अध्यक्षांचा विश्वास 
Pune Mayor Election | पुणे शहराचा पहिला नागरिक ठरणार ६ फेब्रुवारीला!

Pramod Bhangire | प्रभाग ४१ चे टँकरमुक्तीच्या दिशेने ठोस पाऊल | प्रमोद नाना भानगिरे यांच्या पाठपुराव्या नंतर प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन!

 

PMC Ward 41 – (The Karbhari News Service) – प्रभाग क्र. ४१ मधील महादेववाडी, उंड्री परिसरातील सर्व्हे नं. २५, दोराबजी मॉल समोरील उभारलेल्या पाच पाण्याच्या टाक्यांद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत आज पुणे महानगरपालिका चे पाणीपुरवठा अधिकारी नंदकुमार जगताप यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले. या ठिकाणी सुमारे १२० मीटरचे काम अपूर्ण असून ते येत्या १५ ते २० दिवसांत पूर्ण करून या टाक्यांद्वारे सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे पाणीपुरवठा अधिकारी नंदकुमार जगताप यांनी आश्वासन दिले. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली. (Pune Water Supply)

भानगिरे यांनी सांगितले कि, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई लक्षात घेता हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निवडणुकीदरम्यान प्रभाग टँकरमुक्त करण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी हा ठोस पाठपुरावा सुरू आहे. येत्या १५–२० दिवसांत काम पूर्ण होऊन नागरिकांना नियमित पाणी मिळाले नाही, तर शिवसेना स्टाईलने महापालिकेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देखील भानगिरे यांनी दिला आहे.

प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला मुबलक व नियमित पाणी मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. असे  देखील भानगिरे म्हणाले.


 

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई लक्षात घेता हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निवडणुकीदरम्यान प्रभाग टँकरमुक्त करण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी हा ठोस पाठपुरावा सुरू आहे. येत्या १५–२० दिवसांत काम पूर्ण होऊन नागरिकांना नियमित पाणी मिळाले नाही, तर शिवसेना स्टाईलने महापालिकेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

| प्रमोद नाना भानगिरे, शिवसेना शहर प्रमुख


प्रभाग क्र. ४१ मधील महादेववाडी, उंड्री परिसरात १२० मीटरचे काम अपूर्ण असून ते येत्या १५ ते २० दिवसांत पूर्ण करून या टाक्यांद्वारे सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.

| नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

——–

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: