Pradeep Kurulkar Case | शास्त्रज्ञ कुरुलकरांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची जोरदार निदर्शने

HomeBreaking Newsपुणे

Pradeep Kurulkar Case | शास्त्रज्ञ कुरुलकरांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची जोरदार निदर्शने

Ganesh Kumar Mule Jul 03, 2023 1:03 PM

Lokmanya Tilak National Award | डॉ. टेसी थॉमस यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
Honeytrap DRDO Scientist | DRDO Scientist Arrested for Providing Confidential Information to Pakistan
Dr. Pradeep Kurulkar Latest News | NCP Agitation | डॉं. कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची तिव्र निदर्शनें

Pradeep Kurulkar Case | शास्त्रज्ञ कुरुलकरांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची जोरदार निदर्शने

Pradeep Kurulkar Case | डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO)मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर (Scientist Pradeep Kurulkar) यांच्यावर केवळ हेरगिरीचे आरोप पत्र ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल केला गेला नाही असा संतप्त सवाल विचारत पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे (Pune Congress) शिवाजीनगर येथील एटीएस कार्यालयासमोर (ATS Pune) शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. (Pradeep Kurulkar Case)
प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, कॉंग्रेसचे नेते दत्ता बहिरट, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पूजा आनंद यांनी यावेळी एटीएस कार्यालयात निवेदनही दिले.  (Pune News)
शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपशी (BJP) संबंधित असल्यामुळेच देशद्रोहाचा गुन्हा न नोंदवता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर दुर्दैवाने देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला नाही . राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित असल्यामुळेच त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहे हे स्पष्टपणे दिसत आहे असेही निवेदनात म्हंटले आहे.
पुण्यातील डीआरडीओ ही अत्यंत महत्वाची संशोधन संस्था पंतप्रधान कार्यालयाच्या नियंत्रणाखाली असते मात्र तरीही देशद्रोहाचा आरोप लावला जात नाही. त्यामुळेच शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर पुरवणी चार्जशीटमध्ये भारतीय दंड संहिता १२४अ च्या अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईपर्यंत कॉंग्रेस पक्ष अधिक तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीच्या गेल्या ९ वर्षात अनेक पर्यावरणवादी, मानवी हक्कासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते अशा निरपराध शेकडोंवर देशद्रोहाचे गुन्हे नोंदवले गेले आहे. या राज्यवाटीला विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी असे देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात आहे. मात्र ज्याने खरच देशद्रोह केला आहे अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्याशी निगडीत असणाऱ्या शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर मात्र देशद्रोहाचा आरोप न ठेवता त्यांना या गंभीर गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे निषेधार्य आहे, संतप्तजनक आहे. त्याचा प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयाने विरोध केला पाहिजे असे निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी एटीएस कार्यालयाबाहेर झालेल्या निदर्शनात सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत अविनाश बागवे, रमेश अय्यर, प्रशांत सुरसे, नुरुद्दीन सोमजी, चेतन अग्रवाल, चैतन्य पुरंदरे, शाबीर शेख, शानी नवशाद, अजित जाधव, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे पाटील, आशिष व्यवहारे, बाळासाहेब मारणे, विनोद रणदिवे, सुरेश कांबळे, अनिल पवार, अॅड राजेन्द्र काळभरे,  नुर भाई अँथनी, शिरवराज भरत सुराणा, बाबा सय्यद, आशा पाटोळे, राधिका मखामले,  आयुब पठाण, बबीता सोनवणे, सोनी ओव्हळ, परवेज तांबोळी, आशुतोष जाधव, हार्दिक परदेशी, राहुल सुपेकर, सचिन बहिरट, अंजली सोलापुरे,  विनोद रणपिसे, राजु नाणेकर, जयसिंग भोसले आदी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
—-
News Title | Pradeep Kurulkar Case |  Strong protests by the Congress party to file a case of sedition against the scientist Kurulkar