Power outage : Pune : Pimpri-chinchwad : पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित

HomeBreaking Newsपुणे

Power outage : Pune : Pimpri-chinchwad : पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित

Ganesh Kumar Mule Feb 09, 2022 5:34 AM

Pune Power Supply | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वीज पुरवठा विस्कळीत | महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी
MSEDCL | Vivek Velankar | गेल्या पाच महिन्यांपासून महावितरणने विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्दच केलेले नाहीत | महावितरणच्या ढिसाळ कारभारात सुधारणा कधी होणार!
Power Cut In Pune News | महावितरण अधिकाऱ्यांनो कारभार सुधारा अन्यथा नागरिकांसह भव्य मोर्चा काढू

पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित

: महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाईनमध्ये बिघाड

पुणे: महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३०च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी ६ वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.

अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले. तसेच महत्वाचे दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे देण्यात येत आहे.

महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करीत आहेत. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0