Pune Airport Runway | ‘पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासावी’ |  केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे संरक्षणमंत्र्यांना पत्र

HomeBreaking Newsपुणे

Pune Airport Runway | ‘पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासावी’ |  केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे संरक्षणमंत्र्यांना पत्र

गणेश मुळे Jun 20, 2024 2:48 PM

Police | Bonus | महाराष्ट्रातील पोलिस बांधवांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा |  भारतीय मराठा महासंघ
Pune Traffic Update | इतर शहरातून पुण्यामार्गे दुसऱ्या शहराकडे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल | शहरातील अंतर्गत रस्त्यावर जड, अवजड वाहनांसाठी २४ तास प्रवेश बंद
MLA Sunil Kamble |  अपात्र ठेकेदारांना पात्र तर पात्र ठेकेदारांना अपात्र ठरवणाऱ्या मनपा प्रशासनाची चौकशी व्हावी | आमदार सुनील कांबळे विधानसभेत आक्रमक

Pune Airport Runway | ‘पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासावी’ |  केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे संरक्षणमंत्र्यांना पत्र

Pune Airport Runway – (The Karbhari News Service) – पुणे विमानतळाच्या (Pune Airport) धावपट्टीचा विस्तार (Runway Extension) होण्याची चिन्हे आहेत. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (MP Murlidhar Mohol)यांनी याबाबत संरक्षणमंत्र्यांना (Defence Minister) पत्र लिहिले असून, संयुक्त सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊन धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी भारतीय हवाई दलाला सूचना द्याव्यात, अशी विनंती पत्रात केली आहे. पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या मालकीची असल्याने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. (Pune News)

‘भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. त्यातही पुणे विमानतळ हे प्रवाशांची वर्दळ असलेल्या व्यस्त विमानतळांच्या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी ८० लाखांहून अधिक प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला. भविष्यात ही वाढ कायम राखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह विमानतळाचा रन वे (धावपट्टी) वाढविण्याची आवश्यकता आहे व सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे या पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.

‘युरोपिय देश, अमेरिका, जपान या देशांशी थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्यामुळे शहराच्या वाढीवर त्याचागंभीर परिणाम होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच, महाकाय विमानांची (कोड डी/ई प्रकारची विमाने) हालचाल सुलभ करण्यासाठी सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्याची गरज आहे. भारतीय हवाई दलाच्या मालकीच्या पुणे विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. या विस्तारामुळे महाकाय (कोड-डी/ई प्रकारच्या) विमानांची हालचाल सुलभ होईल व आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकेल,’ असेही पत्रात म्हटले आहे.
………….

१००० मीटरने विस्तार आवश्यक

सध्याच्या धावपट्टीची लांबी २५३५ मीटर आणि रुंदी ४५ मीटर आहे. या धावपट्टीवर आता फक्त AB-321 आकाराचे प्रवासी विमानच उतरू शकते. मोठी विमाने उतरण्यासाठी धावपट्टीची लांबी सुमारे १००० मीटरने वाढवणे आवश्यक आहे.
—-

पुणे हे शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी हब असल्याने या प्रस्तावामुळे शहराच्या विकासाला आणि मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ बांधण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे १४ जून २०२४रोजी आम्ही पुणे विमानतळावर आढावा बैठक घेतली. त्यावेळी धावपट्टीच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार माननीय राजनाथजींना पत्र लिहिले आहे. सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट्सच्या आवश्यकतांचे पालन करणाऱ्या क्षेत्राचे OLS संयुक्त सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊन धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी योग्य सूचना देण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे. सोमवारी जाऊन त्यांना भेटणारही आहे.

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक व सहकार