PMRDA चे ड्रोन तंत्रज्ञान झाले अधिक अत्याधुनिक
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अंतर्गत ड्रोन प्रणाली मागील वर्षी माहे ऑगस्ट २०२२ पासून वापरण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने नगर रचना योजना, सुविधा भूखंड हस्तांतर प्रकिया, अनधिकृत बांधकामावर नजर ठेवण्याकरिता ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. पीएमआरडीए हद्दीत सुमारे ८१४ गावांचा समावेश असून एवढ्या मोठ्या क्षेत्राची निगराणी ठेवण्याकरिता पीएमआरडीए कार्यालयाकडून DGPS तसेच CORS असलेले अद्यावत तंत्रज्ञान असलेले ड्रोन खरेदी करण्यात आलेले आहे.
अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या ड्रोनचे दि. २१/०४/२०२३ रोजी श्री. राहुल महिवाल, महानगर आयुक्त तसेच श्री दिपक सिंघला, अतिरिक्त महानगर आयुक्त यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले असून उद्घाटन प्रसंगी केंद्र शासन तसेच राज्य शासनातील विविध विभागातील मान्यवराचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. डॉ. संजय पाटील ,वरिष्ठ शास्त्रज्ञ, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, MRSAC, श्री. एस. त्रिपाठी, अधीक्षक सर्व्हेअर, सर्वे ऑफ इंडिया, पुणे, श्री. सुर्यकांत मोरे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, पुणे , श्री. राजेंद्र पवार, सह संचालक, नगर रचना विभाग, पुणे उपस्थित होते.
DGPS तसेच CORS या अद्यावत तंत्रज्ञान असलेला ड्रोन अधिक कार्यक्षम पद्धतीचा असून पीएमआरडीए कार्यालयामध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अद्यावत करण्यात आलेले आहेत. पीएमआरडीए कार्यालयातील ड्रोन कक्षाकरीता विशेष कौशल्य असलेले तज्ञ व्यक्तीची नेमणुका करण्यात आली असून सदरील कक्ष श्री. रामदास जगताप, उप जिल्हाधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी यांचे नियंत्रणाखाली कार्यरत असून व या कक्षात डॅा. प्रितम वंजारी मुख्य भौगोलिक माहिती तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. अशी माहिती रामदास जगताप, उप जिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए यांनी दिली.