PMRDA News  | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचे आवाहन

HomeBreaking Newsपुणे

PMRDA News  | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचे आवाहन

गणेश मुळे Mar 18, 2024 1:45 PM

PMRDA : PMC : गणेशखिंड रस्त्याला पर्यायी रस्ता!  : PMRDA ने महापालिकेकडे मागितली परवानगी 
PMRDA | पीएमआरडीएने समाविष्ट गावातील पायाभूत सुविधा विकासावर भर द्यावा | पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
Mahalunge TP Scheme : प्रत्येक शेतकऱ्याला टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा होणार  : पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांचे प्रतिपादन

PMRDA News  | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचे आवाहन

 

PMRDA News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्था यांनी हटवावेत किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ३१ मार्चपर्यंत ते लावण्याची परवानगी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (PMRDA Pune)

पीएमआरडीए क्षेत्रात असलेल्या मुख्य चौक, गर्दी वा वर्दळीच्या ठिकाणी, जास्त लांबी, रुंदी व उंचीचे, उंच इमारतीवरील कमाल मर्यादेपेक्षा मोठे तथा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अनधिकृत, धोकादायक असलेले आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स येणाऱ्या उन्हाळी वाऱ्यामुळे पडून किंवा कोसळून जीवितहानी वा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनधिकृत, धोकादायक होर्डिंग, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत हटविण्यात आले नसल्यास पीएमआरडीकडून निष्कासित करण्यात येतील. तसेच होर्डिंगमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित जाहिरातदार संस्था यांना व्यक्तिशः जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही पीएमआरडीचे विकास परवानगी विभागाचे महानगर नियोजनकार सुनिल मरळे यांनी कळविले आहे