PMRDA Housing | पीएमआरडीएच्या घरांना वाढता प्रतिसाद; अर्जासाठी शेवटचे दोन द‍िवस शिल्लक

Homeadministrative

PMRDA Housing | पीएमआरडीएच्या घरांना वाढता प्रतिसाद; अर्जासाठी शेवटचे दोन द‍िवस शिल्लक

Ganesh Kumar Mule Nov 28, 2024 8:22 PM

Pune Pub News | पुण्यातील वाढत्या पब अनाचाराला आवर घाला | महायुती
Hoardings in Merged villages | समाविष्ट गावातील होर्डिंग व्यावसायिकांना प्रति चौरस फूट २२२ रुपये शुल्क भरावे लागणार | उच्च न्यायालयाचे आदेश
Big Breaking News | PMC Pune | वर्ष होत आले तरी स्थायी समितीच्या सदस्यांच्या हिशोबाचा घोळ मिटेना | आज कहरच झाला!

PMRDA Housing | पीएमआरडीएच्या घरांना वाढता प्रतिसाद; अर्जासाठी शेवटचे दोन द‍िवस शिल्लक

 

| सदन‍िकांसाठी पावणेदोन हजार जणांनी भरली अनामत रक्कम

 

PMRDA Pune – (The Karbhari News Service) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०-३२ येथील सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेअंतर्गत शिल्लक सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यास प्रत‍िसाद म‍िळत असून आतापर्यंत पावणेदोन हजार जणांनी अनामत रक्कम भरली आहे. पीएमआरडीएच्या सदन‍िकांना वाढता प्रतिसाद म‍िळत असून शन‍िवार, ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंतच अर्ज करण्याची संधी आहे.

पीएमआरडीच्या पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (1 बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिका आण‍ि पेठ क्र. ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (1 आरके) प्रवर्गात ३४७ तसेच एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांच्या लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी १२ ऑक्टोबरपासून नागर‍िकांकडून अर्ज मागव‍िण्यात येत आहे. यात गुरुवार, २८ नोव्हेंबर दुपारी तीनपर्यंत ४ हजार ८६१ नागर‍िकांनी संकेतस्थळावर आपली प्राथम‍िक नोंदणी केली असून १ हजार ७१७ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. या सदन‍िकांसाठी शन‍िवार, ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंतच अर्ज भरता येणार असल्याने नागरिकांनी https://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पीएमआरडीचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0