PMRDA Housing | पीएमआरडीएच्या सदन‍िकांना वाढता प्रतिसाद | दोन हजार ८६४ जणांची अनामत रक्कम जमा; अर्जासाठी दोन द‍िवस शिल्लक

Homeadministrative

PMRDA Housing | पीएमआरडीएच्या सदन‍िकांना वाढता प्रतिसाद | दोन हजार ८६४ जणांची अनामत रक्कम जमा; अर्जासाठी दोन द‍िवस शिल्लक

Ganesh Kumar Mule Dec 13, 2024 7:44 PM

Ganeshkhind road widening paved the way!| The High Court has lifted the stay on removal of 72 trees
PMRDA Draft DP |  Why was PMRDA’s draft development plan postponed while it was awaiting approval?
Hinjewadi- Shivajinagar Metro | हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो साठी केंद्र शासनाकडून ४१० कोटी प्राप्त

PMRDA Housing | पीएमआरडीएच्या सदन‍िकांना वाढता प्रतिसाद | दोन हजार ८६४ जणांची अनामत रक्कम जमा; अर्जासाठी दोन द‍िवस शिल्लक

 

PMRDA Pune – (The Karbhari News Service) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथे सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेतंर्गत सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यास प्रत‍िसाद म‍िळत असून आतापर्यंत २ हजार ८६४ नागर‍िकांनी अनामत रक्कम जमा केली आहे. नागर‍िकांकडून पीएमआरडीएच्या सदन‍िकांना वाढता प्रतिसाद म‍िळत असून रव‍िवार, १५ ड‍िसेंबर २०२४ पर्यंतच अर्ज करता येणार आहे.

पीएमआरडीच्या पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ईडब्ल्यूएस (1 बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिकांची लॉटरी काढण्यात येणार आहे. यासह पेठ क्रमांक ३०-३२ येथे ईडब्ल्यूएस (1 आरके) प्रवर्गात ३४७ तसेच एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक असलेल्या सदनिकांच्या लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज मागव‍िण्यात येत आहे. यात शुक्रवार, १३ ड‍िसेंबर दुपारपर्यंत २ हजार ८६४ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. या सदन‍िकांसाठी रव‍िवार, १५ ड‍िसेंबर २०२४ पर्यंतच अर्ज भरता येणार आहे. इच्छुक नागरिकांनी https://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0