PMRDA DP | पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा जाहीर करून बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांचा विकास पीएमरडीएअंतर्गत करावा   | खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

HomeBreaking Newsपुणे

PMRDA DP | पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा जाहीर करून बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांचा विकास पीएमरडीएअंतर्गत करावा | खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

गणेश मुळे Jul 12, 2024 2:56 PM

PMC Garbage Collection | धायरी, आंबेगाव, नऱ्हे परिसरात कचऱ्याचे कंटेनर नाहीत | खासदार सुप्रिया सुळे यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार
Vetal Tekdi | MP Supriya Sule | वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार |खासदार सुप्रिया सुळे 
Employment | यशवंतराव चव्हाण सेंटर देणार मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार

PMRDA DP | पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा जाहीर करून बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांचा विकास पीएमरडीएअंतर्गत करावा

| खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

MP Supriya Sule – (The Karbhari News Service) –  पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा त्वरित जाहीर करण्याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त रस्त्यांचा विकास पीएमआरडीए अंतर्गतच व्हावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याशिवाय विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे, मतदार संघातील घरकुलांसाठी आराखडा तयार करून या योजनेच्या कामांची सद्य स्थिती समजायला हवी, आणि पीएमरडीएच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्यात यावीत, असे त्यांनी म्हटले आहे.

सुळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज औंध येथील पीएमरडीएच्या कार्यालयात आयुक्त योगेश म्हसे भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काका चव्हाण, महादेव कोंढरे, भारती शेवाळे, सुधाकर गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदार संघातील तालुकानिहाय विविध कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला विधानसभा मतदार संघ आणि तालुकानिहाय मागण्या पुढीलप्रमाणे : –

भोर तालुका
*तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मध्ये निम्या क्षेत्रात वेगळा झोन व निम्या क्षेत्रामध्ये वेगळा झोन चे आरक्षण टाकण्यात आले आहे.
* अनेक शेतकरी यांच्या संपुर्ण जमिनी संपादीत होत आहे आणि सदरील शेतकरी भूमीहीन होत आहेत.
* झोन दाखल्यासाठी आणि बांधकाम किंवा अन्य परवानगीसाठी शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे तालुक्याच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करावी

मुळशी तालुका
* पिरंगूट येथे एस. टी. पी. लाईन आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा.
* इ. जि. मा. ७९ उरवडे ते पिरंगूट घाट रस्ता कॉंक्रिटीकरण करणे

पुरंदर तालुका
* दिवे येथील ढुमेवाडी जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील ढुमे भांडार येथे अग्निशमन केंद्र व्हावे.

हवेली तालुका
* टाऊन प्लॅनिंग ३, ४, ५ च्या कामांच्या सद्यस्थितिबाबत माहिती मिळावी.

खडकवासला
* नऱ्हे धायरी रोड येथील श्री कंट्रोल चौकातील अतिक्रमण काढून चौकाचे रूंदीकरण करावे.
* धायरी परिसरामध्ये वेगवेगळया ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी केलेली आहे. तरी ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर बसविण्यात यावेत.
* नांदेड सिटी ते धायरी भागातील ओढ्यातून टाकलेली मोठी केबल उघड्यावर असल्यामुळे इतर कामास अडथळा येतो व नागरिकांच्या जीवीताला धोका होवू शकतो, तरी त्यावर त्वरीत योग्य ती उपाययोजना करावी.
* धायरी परिसरात वाढत्या नागरिकरणामुळे विजेची मागणी मोठया प्रमाणावर आहे. तरी अंबाई दरा येथील सरकारी गायरान जमिनीवर MSEB सबस्टेशन उभारण्यात यावे.
* सिंहगड रोड व धायरी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. त्यावर योग्य उपाययोजना करावी.