पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांचा संप मागे; बससेवा पूर्वपदावर
आज पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांनी सकाळच्या सत्रात प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आडमुठे धोरण स्वीकारून संप पुकारला होता. यामुळे ६८३ बस बंद होत्या तर फक्त ९९ बस रस्त्यावर होत्या. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान पारी प्रशासन व ठेकेदार चर्चेअंती संप मागे घेण्यात आला व बस सेवा पूर्वपदावर आली. अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
या संपामध्ये मे.ओलेक्ट्रा ग्रीनटेक, मे.ट्रॅव्हलटाईम कार रेटल प्रा.लि, मे.अॅन्टोनी गॅरेजेस प्रा.लि, मे. हंसा वहन इंडिया प्रा.लि., मे.एमपी इन्टरप्रायजेस अॅन्ड असोसिएटस लि, मे. इव्ही ट्रान्स प्रा.लि या कंपन्यांनी संपात सहभाग घेतला होता.
ठेकेदारांनी कोणतीही पूर्वसूचना न देता हा संप पुकारला असल्याने ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी प्रशासन व ठेकेदार चर्चेअंती संप मागे घेण्यात आला व बस सेवा पूर्वपदावर आली.
: मनसे कडून आंदोलन
पुणेकरांच्या सेवेसाठी असणाऱ्या बसची सुविधा अचानकपणे बंद केल्यामुळे बसप्रवासी, नागरीक, विध्यार्थी, कामगार, छोटे व्यापारी असे अनेक घटक आज अचानकपणे अनेक मार्गावरील बस सुविधा बंद केल्या मुळे अनेकांना मोठी अडचण निर्माण झाली. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पी एम पी एल प्रशासन कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. बस सेवा पुरवणाऱ्या ठेकेदारांची बिले थकवल्याने त्यांनी सेवा बंद केली परंतु प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनाचा पुणेकरानी त्रास का सहन करायचा असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारण्यात आला पी एम पी एल सीएमडी मिश्रा यांना पक्षच्या वतीने निवेदन देण्यात आले.
COMMENTS