PMPML Student Bus Pass | पीएमपीएमएल कडून पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांकरिता अनुदानित पासेसचे वितरण सुरु

HomeपुणेBreaking News

PMPML Student Bus Pass | पीएमपीएमएल कडून पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांकरिता अनुदानित पासेसचे वितरण सुरु

Ganesh Kumar Mule Jun 20, 2023 4:13 PM

Pune Municipal Corporation Security Guard | पुणे महापालिका राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेणार 100 सुरक्षारक्षक
AAP Vijay Kumbhar | पिंपरी चिंचवडमध्ये ‘आप’स्वबळावर लढणार व महापौर बसणार : विजय कुंभार
Property Survey | Devendra Fadnavis | सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

PMPML Student Bus Pass | पीएमपीएमएल कडून पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांकरिता अनुदानित पासेसचे वितरण सुरु

PMPML Student Bus Pass | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpari Chinchwad Municiapal Corporation) शाळेतील इ. ५ वी ते १० वी चे विद्यार्थ्यांना सन २०२३ – २०२४ या शैक्षणिक वर्षाकरिता १०० % अनुदानित मोफत बस प्रवास पास व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी चे विद्यार्थ्यांना ७५% सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरु करण्यात आली असून  पासेससाठी दि. १५ जून २०२३ पासून सर्व आगारामध्ये व सर्व पासकेंद्रावर अर्ज वितरीत केले जात आहेत. अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. (PMPML Student Bus Pass)

पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले कि,  भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांकरिताचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रित रित्या घेवून जाऊ शकतात. तसेच सदरचे अर्ज भरून एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते पास शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही.

खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पासचे रकमेचे २५% रक्कमेनुसारचे चलन तयार करून देणेत येईल ते चलन विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील बँक ऑफ बडोदा चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्जासोबत चलन व आवश्यक
कागदपत्रे जोडून जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. तसेच सदरचे पासेस करीता अर्ज वितरण दि. १५/०६/२०२३ पासून महामंडळाच्या सर्व आगारामधून करण्यात येत आहे.

योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारामध्ये उपलब्ध आहे. तरी पिंपरी चिंचवड मनपाचे शाळेतील व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

अधिक महितीसाठी संपर्क क्र. ०२०-२४५४५४५४


News Title | PMPML Student Bus Pass | Distribution of subsidized passes from PMPML to students in Pimpri-Chinchwad municipal limits has started