PMPML Services | ७६ व्या प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून पीएमपीएमएल कडून प्रवाशांच्या सोयीसाठी ३ प्रणालींचे उद्‍घाटन

Homeadministrative

PMPML Services | ७६ व्या प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून पीएमपीएमएल कडून प्रवाशांच्या सोयीसाठी ३ प्रणालींचे उद्‍घाटन

Ganesh Kumar Mule Jan 26, 2025 7:57 PM

PMPML Pune Recruitment |  Driver, conductor recruitment in PMPML or not?  Know in detail
Green Hydrogen Policy | PMC Pune | हरित हायड्रोजन धोरणा बाबत राज्य सरकारने पुणे महापालिकेकडून मागवला अभिप्राय!
PMPML Pune | गणेश उत्सवात रात्री १२ नंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत | पीएमपी प्रशासनाची माहिती 

PMPML Services | ७६ व्या प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून पीएमपीएमएल कडून प्रवाशांच्या सोयीसाठी ३ प्रणालींचे उद्‍घाटन

 

Pune PMP News – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) मुख्य प्रशासकीय कार्यालय स्वारगेट येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2025) उत्साहात साजरा करणेत आला. परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  दिपा मुधोळ-मुंडे (Dipa Mudhol Mundhe IAS) यांच्या हस्ते आणि सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर (Nitin Narvekar PMC)  व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार- पवार (Pradnya Potdar Pawar PMC) तसेच परिवहन महामंडळाचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला. महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  दिपा मुधोळ-मुंडे यांच्या संकल्पनेतून वरील ३ प्रणाली आजपासून प्रवाशी सेवेत कार्यान्वित करणेत आल्या. (Pune PMPML News)

७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपली पीएमपीएमएल या मोबाईल अॅपचे आय.ओ.एस. व्हर्जन, कमांड कंट्रोल सेंटर स्वारगेट येथे प्रवाशांच्या सोयीसाठी बस लाईव्ह ट्रॅकिंग प्रणालीचे वेब व्हर्जन व महामंडळाच्या स्वमालकीच्या बसेसमध्ये एल.ई.डी. (पी.आय.एस.) बोर्ड व नेक्स्ट स्टॉप अनाऊन्समेंट प्रणाली या तिन्ही प्रणालींचे उद्‍घाटन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

वरील तीन प्रणालींची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणेः-

आपली पीएमपीएमएल या मोबाईल अॅपचे आय.ओ.एस. व्हर्जन

 

“आपली पीएमपीएमएल” हे मोबाईल अॅप महामंडळाकडून १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आले होते. प्रवाशांकडून या अॅपच्या आय.ओ.एस. व्हर्जन ची मागणी वारंवार केली जात होती. सदर मागणी विचारात घेवून आपली पीएमपीएमएलया मोबाईल अॅपचे आय.ओ.एस. व्हर्जन तयार करणेत आले आहे. आय.ओ.एस. व्हर्जन सुरू झाल्याने आता “आपली पीएमपीएमएल” हे मोबाईल अॅप अॅन्ड्रॉईड व आय.ओ.एस. मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध आहे.

| कमांड कंट्रोल सेंटर स्वारगेट येथे प्रवाशांच्या सोयीसाठी बस लाईव्ह ट्रॅकिंग प्रणालीचे वेब व्हर्जन

आतापर्यंत बसचे लाईव्ह लोकेशन फक्त मोबाईल अॅप मध्ये दिसत होते. परंतु आता कमांड कंट्रोल सेंटर स्वारगेट येथे बस चौकशी/बस विलंब/तक्रार/आपत्तीच्या वेळी प्रवाशांचा फोन आल्यानंतर कमांड कंट्रोल सेंटर मधील कर्मचाऱ्यांना बस लाईव्ह ट्रॅकिंग प्रणालीच्या वेब व्हर्जन मुळे बसचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे व तशी
माहिती प्रवाशांना देता येणार आहे.

महामंडळाच्या स्वमालकीच्या बसेसमध्ये एल.ई.डी. बोर्ड व नेक्स्ट स्टॉप अनाऊन्समेंट प्रणाली

महामंडळाच्या मालकीच्या सर्व बसेसमधील एल.ई.डी. बोर्ड ची दुरूस्ती करून सदरचे एल.ई.डी. बोर्ड (मार्गफलक) प्रवाशांच्या सोयीसाठी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून स्वारगेट डेपोतील बसेसमध्ये एल.ई.डी. बोर्ड (मार्गफलक) व नेक्स्ट स्टॉप अनाऊन्समेंट (पुढील बसथांब्याची उद्‍घोषणा) प्रणाली कार्यान्वित करणेत आलेली आहे. एल.ई.डी. बोर्ड मुळे प्रवाशांना बसचा मार्गफलक सहजरीत्या व स्पष्टपणे दिसण्यास मदत होणार आहे. महामंडळाच्या आय.टी. विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेवून महामंडळातीलच

कर्मचाऱ्यांची इन-हाऊस टीम तयार केली व त्यांना ट्रेनिंग देवून एल.ई.डी. बोर्ड ची दुरूस्ती केली. त्यामुळे महामंडळाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत झालेली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0