PMPML | Pune Smart City Director | पीएमपी च्या संचालक पदी कुणाला दिली जाणार संधी? | स्मार्ट सिटी वर देखील संचालक नियुक्त केले जाणार! 

Homeadministrative

PMPML | Pune Smart City Director | पीएमपी च्या संचालक पदी कुणाला दिली जाणार संधी? | स्मार्ट सिटी वर देखील संचालक नियुक्त केले जाणार! 

Ganesh Kumar Mule Mar 14, 2026 8:37 PM

PMRDA | PMC | समाविष्ट गावांतील समस्यांबाबत महापालिका आणि PMRDA ची उद्या बैठक
Covid | कोविड च्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष
PMRDA Draft DP | प्रारूप विकास आराखड्या बाबत पीएमआरडीएच्या आठ याचिका निकाली | उज्वल केसकर यांच्या याचिकावर २५ ऑगस्ट ला सुनावणी 

PMPML | Pune Smart City Director | पीएमपी च्या संचालक पदी कुणाला दिली जाणार संधी? | स्मार्ट सिटी वर देखील संचालक नियुक्त केले जाणार!

 

Pune PMP – (The Karbhari News Service) – पुणे परिवहन महामंडळाकडील अर्थात पीएमपीच्या  संचालक मंडळाच्या कायम स्वरूपी रचनेमधील पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेच्या माध्यमातून प्राधिकृत केलेल्या विद्यमान सदस्याची संचालक म्हणून निवड केली जाणार आहे. १८ मार्च च्या मुख्य सभेत हा निर्णय केला जाणार आहे.  यात भाजप कुणाला संधी देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच स्मार्ट सिटी वर देखील संचालक नियुक्त केले जाणार आहेत. याबाबत मुख्य सभेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. (PMC General Body Meeting)

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. या कंपनीच्या संचालक मंडळाची कायमस्वरूपी रचना ही  शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिका मुख्य सभेने प्राधिकृत केलेल्या एका सदस्याची महामंडळाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात येते. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेने  प्रकाश ज्ञानोबा ढोरे यांची संचालक म्हणून निवड करण्यात येत असल्याचा नियुक्तीचा ठराव पारित केला होता. तथापि दिनांक १४/०३/२०२२ पासून पुणे महानगरपालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सदर ठिकाणी महापालिका आयुक्त यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे  महामंडळाकडील पदसिध्द संचालक सभासद, पुणे महागरपालिका यांचा महामंडळाकडील संचालक पदाचा कार्यकाळ संपुष्ट आल्याने  प्रकाश ज्ञानोबा ढोरे यांची संचालक या पदाची नियुक्ती दिनांक १४/०३/२०२२ पासून संपुष्टात आली आहे.

शासन निर्णयानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील  संचालक मंडळाच्या कायमस्वरूपी रचनेमधील पुणे महानगरपालिकेच्या पदसिध्द संचालकांव्यतिरिक्त एका सदस्यास मुख्य सभेने प्राधिकृत करणे आवश्यक आहे. त्यानुसार सदस्याचे नाव आम्हास कळवले जावे, असे पत्र पीएमपी प्रशासनाने महापालिका प्रशासनाला दिले आहे. त्यानुसार १८ च्या मुख्य सभेत याबाबत निर्णय केला जाणार आहे.

—-

याच प्रमाणे स्मार्ट सिटी ने देखील महापालिका प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यानुसार  पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या विशेष उदेश वाहन करीता सचांलक नेमणूक करावयाचे सरकारच्या निर्णयात नमूद आहे. त्यानुसार  पुणे महानगरपालिकेचे ६ संचालक नामनिर्देशित करणे आवश्यक आहे. दरम्यान महापालिकेची पाच वर्षाची मुदत  १४/०३/२०२२ पासून संपुष्टात आल्यामुळे संबंधित संचालक  पदे रिक्त आहेत.  जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर नव्याने निवडून आलेल्या सभासदांमधून संचालकांचे नामनिर्देशन  खालीलप्रमाणे करणे गरजेचे आहे.

१) महापौर
२)  स्थायी समिती अध्यक्ष
३) विरोधी पक्षनेते
४) सभागृह नेते
५) राजकीय पक्ष वगळून महानगरपालिकेमधील इतर राष्ट्रीय/राज्य् मान्यताप्राप्त् दोन राजकीय पक्षांच्या संख्याबळाच्या उतरत्या क्रमानुसार प्रत्येकी एक याप्रमाणे महासभेकडून दोन संचालक.

याचा निर्णय देखील १८ च्या सभेत घेतला जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: