PMPML Pune | पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालण्याबाबत पीएमपीएमएल कडून पुणे पोलीसांना सूचना

HomePMPML

PMPML Pune | पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालण्याबाबत पीएमपीएमएल कडून पुणे पोलीसांना सूचना

Ganesh Kumar Mule May 29, 2025 8:41 PM

Prashant Jagtap Vs BJP | बिल्डरसाठी भाजपच्या आमदार व नगरसेवकांची नागरिकांना दमदाटी | राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप
Integrated Food Security Scheme | नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना सुरू | 81.35 कोटी लाभार्थ्यांना मिळणार मोफत रेशन
B Voc in Journalism Course |पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बी. व्होक पत्रकारिता पदवीचे प्रवेश सुरु | बारावी नंतर पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात कौशल्यपूर्ण करिअरची संधी

PMPML Pune | पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालण्याबाबत पीएमपीएमएल कडून पुणे पोलीसांना सूचना

 

Pune PMP – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील प्रवाशांकरिता सार्वजनिक बस सेवा पुरविली जाते. सद्यस्थितीत महामंडळामार्फत ३८१ बसमार्गांवर दररोज २०,११२ फेऱ्यांद्वारे सुमारे १० ते ११ लाख प्रवाशांना सक्षम, किफायतशीर व सुरक्षित सेवा पुरवली जात आहे. तथापि, दररोजच्या बस संचलनादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात खालीलप्रमाणे काही गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे: (Pune Police)

 अज्ञात व्यक्तींकडून प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू आणि पाकिटांची चोरी
 आय टिजिंग (अश्लील हावभाव किंवा शब्दांचे उच्चारण)
 काही असामाजिक घटकांकडून बीआरटी बसस्थानकांमध्ये अश्लील मजकूरांचे लिखाण/चित्रांकन करून स्थानके
विद्रूप करणे

या अनुचित घटनांमुळे विशेषतः महिला प्रवासी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, या संदर्भात पीएमपीएमएलकडे प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

तरी अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता, खाली नमूद करण्यात आलेल्या मुख्य बसस्थानकांवर तसेच गर्दीच्या प्रमुख मार्गांवर सकाळी व रात्रीच्या वेळेत पोलिस यंत्रणेमार्फत नियमित गस्त घालणे अत्यावश्यक आहे.

मुख्य बसस्थानके (जिथे गस्त आवश्यक)

स्वारगेट मुख्य बसस्थानक, डेक्कन स्टँड, दांडेकर पुल, कात्रज मुख्य बसस्थानक, सर्पोद्यान कात्रज, मार्केट यार्ड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, शास्त्री रोड, गणपती माथा, पुणे मनपा मुख्य स्थानक, पुणे स्टेशन, हडपसर गाडीतळ, मनपा डेंगळे पुलाखाली, वाघोली बसस्थानक, पिंपरी आंबेडकर चौक, निगडी प्राधिकरण, चिंचवड, भोसरी बसस्थानक

गर्दीचे प्रमुख बसमार्ग (जिथे गस्त आवश्यक)

२ – स्वारगेट ते शिवाजीनगर, ५ – स्वारगेट ते पुणे स्टेशन, २४ – कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (समतानगर), २४ अ – कात्रज ते लोहगाव, २९ – स्वारगेट ते आळंदी, ४२ – कात्रज ते निगडी, ६४ – भेकराईनगर ते एनडीए गेट, ९८ – वाघोली ते वारजे माळवाडी, ९९ – कोथरूड डेपो ते विश्रांतवाडी, ११९ – मनपा ते आळंदी, १२३ – निगडी ते मनपा, १३९ – शेवाळेवाडी ते निगडी, १४० – अप्पर ते पुणे स्टेशन, १४९ – हडपसर ते निगडी, १५९ – मनपा ते तळेगाव, १६१ – वाघोली ते कारेगाव, १८८ – हडपसर ते कात्रज (म्हात्रवाडी मार्गे), २०१ – भेकराईनगर ते आळंदी, २३४ – मनपा ते खराडी, २३५ – कात्रज ते खराडी, २३६ – कात्रज ते वाघोली, २९१ – हडपसर ते कात्रज (कोंढवा मार्गे), २९९ – कात्रज ते भोसरी, २९८ – कात्रज ते चिंचवडगाव, ३०१ – शेवाळेवाडी ते कात्रज.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी पीएमपीएमएल प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपरोक्त मुख्य बसस्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीच्या वेळेत सकाळी व संध्याकाळी पोलीस पथकामार्फत गस्त (टेहाळणी) घालण्याबाबत पोलीस आयुक्त, पुणे शहर यांना सूचना दिलेल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: