Kothrud Pune | खड्डेमुक्त कोथरुडसाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून मतदारसंघातील खड्डे बुजवले

Homeपुणे

Kothrud Pune | खड्डेमुक्त कोथरुडसाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून मतदारसंघातील खड्डे बुजवले

Ganesh Kumar Mule Sep 08, 2024 8:27 PM

Kothrud Constituency | Shivsena UBT | कोथरूड विधानसभा मतदार संघात होऊ द्या चर्चा, बोलघेवडया सरकारचा भांडाफोड कार्यक्रमाचे आयोजन 
Chhaava Movie | ‘छावा’ चित्रपट एक लाख नागरिकांना दाखवणार!
Chandrakant Patil Kothrud Vidhansabha | चंद्रकांतदादा पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

Kothrud Pune | खड्डेमुक्त कोथरुडसाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून मतदारसंघातील खड्डे बुजवले

 

Pune News – (The Karbhari News Service) – खड्डेमुक्त कोथरुडसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil)  यांनी पुढाकार घेतला असून, लोकसहभागातून मतदारसंघातील (Kothrud Constituency) खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरुडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Pune Potholes)

पुणे शहरात सुरू जुलै आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजविण्यात येतील, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले; तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे या कामात अडथळे येत आहेत.

परिणामी वारंवार पडणाऱ्या पावसामुळे नव्याने खड्डे पडण्याने नागरिक देखील हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून मतदारसंघातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.

या अंतर्गत आतापर्यंत कोथरुड मतदारसंघातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडीमधील मुख्य रस्त्यांवरील ४० खड्डे, कोथरूड मधील ३०० खड्डे बुजवले आहेत. उर्वरित खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरुडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराबद्दल कोथरुड करांकडून समाधान व्यक्त होत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0