PMPML Pune | पीएमपीएल च्या ताफ्यात नवीन बस गाड्या  घेण्याची आवश्यकता!

HomeपुणेBreaking News

PMPML Pune | पीएमपीएल च्या ताफ्यात नवीन बस गाड्या घेण्याची आवश्यकता!

गणेश मुळे Mar 13, 2024 3:47 AM

E Bus : PMPML : पीएमपीएमएलच्या ‘ई-बस’ ने गाठला अडीच कोटी किमी धावेचा टप्पा : सिंहगड ई-बस सेवेचा शुभारंभ
Pune Property Tax | शास्ती कराची सवलत सरसकट पुणे शहराला द्या | आमदार सुनील टिंगरे यांची अजित पवार यांच्याकडे मागणी 
Mukhyamantri Majhi ladki Bahin | ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील

PMPML Pune | पीएमपीएल च्या ताफ्यात नवीन बस गाड्या  घेण्याची आवश्यकता!

– माजी आमदार मोहन जोशी

 

PMPML Pune – (The Karbhari News Service) – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील बस प्रवाशांची संख्या वाढत असल्याने २००० नवीन बस गाड्यांची भर घालावी, अशा मागणीचे निवेदन माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना  दिले.

सद्यस्थितीत पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या २,०२८ इतकी आहे. त्यातही ३०० ते ४०० बस गाड्या ऐनवेळी बिघडतात किंवा दुरूस्तीसाठी आगारात असतात. साधारणतः १,६०० बस गाड्याच उपलब्ध असतात. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि आसपासचा परिसर मिळून १कोटी लोकसंख्या आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढतेच आहे. हे लक्षात घेऊन पीएमपीएमएलच्या ताफ्यात कमीतकमी २००० नवीन बस गाड्यांची भर घालणे आवश्यक आहे, याकरिता राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमपीएमएलच्या बस सेवेची चांगली कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. शहरात मेट्रो असली तरी, पीएमपीएल सक्षम करणे, हा सद्यस्थितीत एकमेव पर्याय आहे, असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे. उपमुख्य मंत्री अजितदादा पवार यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.