PMPML Pune | वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या PMPML च्या चालक – वाहक सेवकांवर होणार कारवाई
PMPML Pune | परिवहन महामंडळाकडुन पुणे, पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या ग्रामीण भागात व पी.एम.आर.डी.ए.कार्यक्षेत्रा पर्यंत बससेवा पुरविली जात आहे. त्यामध्ये पी.एम.पी.एम.एल. व खाजगी ठेकेदाराच्या बसेसवरील चालक सेवक हे वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याबाबत प्रवाशी नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांचेकडुन तक्रारी व सुचना प्राप्त होत असतात. त्यानुसार आता अशा वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या PMPML चालक – वाहक सेवकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMPML Pune News)
या तक्रारीमध्ये प्रामुख्याने मोबाईलवर बोलुन बसेस चालविणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धुम्रपान करणे, रूट बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे इ. तक्रारीचा समावेश आहे.
महामंडळाकडील चालक-वाहक सेवकांच्या गैरवर्तनाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निराकरण होणाच्या द्दष्टीने महामंडळाने कार्यालय परिपत्रकाद्वारे चालक-वाहकांना सुचना दिल्या आहेत कि, बस संचलन करतांना मोबाईल फोनचा वापर करू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन योग्यरित्या करणे, धुम्रपान करण्यात येऊ नये, बसेस बस स्टॉपवर लगत उभ्या करण्यात याव्यात, लेनच्या शिस्तीचे पालन करणे, भरधाव वेगाने बसेस संचलन करू नये अशा विविध प्रकारच्या सुचना दिलेल्या आहेत. (Pune News)
तरी यापुढे वरील नियमांचे पालन न केल्यास सदरील तक्रारीचे शहानिशा करून संबंधित चालक-वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे महामंडळाकडुन कर्मचाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत.