PMPML Privatisation | पीएमपीच्या डेपोंचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव रद्द करा | प्रमोद नाना भानगिरे यांचा आंदोलनाचा इशारा
Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळातील काही डेपोंचे खाजगीकरण करण्याच्या संदर्भातील प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी पीएमपी सीएमडी दीपा मुधोळ यांच्याकडे केली आहे. (PMPML News)
प्रमोद नाना भानगिरे यांच्या निवेदना नुसार संचालक व अध्यक्ष या नात्याने सीएमडी पीएमपीएलच्या उत्पन्न वाढीसाठी करीत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल मुधोळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मात्र येत्या काही दिवसात पीएमपीएमएल च्या हडपसर, शेवाळेवाडी व भेकराईनगर डेपो संपूर्णतः खाजगीकरण करण्यासंदर्भातील प्रस्ताव पीएमपीएमएल प्रशासनात सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. पीएमपीएमएल कर्मचारी हे संपूर्णतः पीएमपीएमएल प्रशासनाच्या वेतनश्रेणीनुसार कार्यरत आहेत. नियमानुसार पीएमपीएमएल चे स्व-मालकीच्या 60% बसेस संख्या तसेच 40% ही खाजगी ठेकेदारांना निविदा पद्धतीने देण्यात येत आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि , मात्र खाजगी ठेकेदारांच्या दबावामुळे पीएमपीएमएल चे बसेसची संख्या कमी करून काही डेपोतील संपूर्ण बसेस संख्या ही खाजगी ठेकेदारांच्या अखत्यारित येण्यासंदर्भातील प्रस्ताव विचाराधीन असल्याचे कळते. तरी या विषयात पीएमपीएमएल प्रशासन व पी एम पी एम एल बचाव समितीच्या माध्यमातून तात्काळ बैठक लावत कर्मचाऱ्यांची होणारी दिशाभूल थांबवावी.
तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या खाजगीकरणा संदर्भातील कोणता ही प्रस्ताव आपण रद्द करावा. अशी मागणी या पत्राद्वारे आम्ही करत आहोत. असे भानगिरे यांनी सांगितले.
शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या व कष्टकऱ्यांच्या तसेच मराठी माणसाच्या सदैव पाठीशी उभी राहिली असून संपूर्णतः काही डेपो मधील बसेसची संख्या ही खाजगी कंपन्यांच्या ठेकेदारांकडे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जाऊ देणार नाही. आपण तात्काळ या संदर्भातील बैठक येत्या चार ते पाच दिवसात नियोजित करावी . अन्यथा शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.
COMMENTS