PMPML Contractor Strike | PMPML म्हणते  संपाचा  बससेवेवर परिणाम नाही

HomeBreaking Newsपुणे

PMPML Contractor Strike | PMPML म्हणते संपाचा बससेवेवर परिणाम नाही

Ganesh Kumar Mule Aug 26, 2023 2:20 PM

PMPML Pune | मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरु करा
First waste to Hydrogen plant in India | पुणे महापालिका प्रायोगिक तत्त्वावर ०.६ टन हायड्रोजन ची करणार निर्मिती! 
PMPML Employees | पीएमपीएलच्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करण्यावर शिक्कामोर्तब! | फरकाची रक्कम चार टप्प्यात देणार

PMPML Contractor Strike | PMPML म्हणते  संपाचा  बससेवेवर परिणाम नाही

PMPML Contractor Strike |२५ व २६ ऑगस्ट २०२३ रोजी ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडीलकोथरूडपुणे स्टेशन व वाघोली डेपोतील इलेक्ट्रिक व सीएनजी बसेस वरील चालकांनीप्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आडमुठे धोरण स्वीकारून संप पुकारला आहे. तथापि ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी पुकारलेल्या संपाचा Pmp च्या बससेवेवर कोणताही परिणाम होवू नये यासाठी प्रशासनानेमहामंडळाकडील चालक खासगी बसेसवरती नेमून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी  घेतली आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMPML Contractor Strike) 

ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी अचानक पुकारलेल्या संपामुळेनिर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालक यांच्या असलेल्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाकडून नियमित मार्गस्थ होणारेजवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले

खासगी बस ठेकेदाराकडील चालकांच्या संपामुळे पीएमपीएमएल च्या बससेवेवर फार परिणाम झाला नसल्याचे खालील तपशीलावरून दिसून येते.

अ.क्र.

दिनांक

मार्गावरील बसेसची संख्या

प्रवाशी संख्या

उत्पन्न

२४/०८/२०२३

१७०५

१३,४५,०९१

१,८८,९७,९२२

२५/०८/२०२३

१६०२

१३,००,७४९

१,७८,२४,२२०

परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. सचिन्द्र प्रताप सिंहयांनी संपकाळात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वकर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलेतसेच साप्ताहिक सुट्टी असताना देखील जे चालकवाहक व वर्कशॉप कर्मचारी कामावर रुजू झाले त्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.पीएमपीएमएल ची बससेवा ही अत्यावश्यक सेवा आहे व या बससेवेवर सर्व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे ट्रॅव्हलटाईम या खासगी बसठेकेदाराकडील चालकांनी पुकारलेल्या संपामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळून प्रवाशी सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी पीएमपीएमएल कडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यातयेत आहेत.

दरम्यान कोथरूड डेपोकडील ट्रॅव्हलटाईम च्या चालकांचा संप मिटला आहे. मात्रट्रॅव्हलटाईम या ठेकेदाराकडील पुणे स्टेशन व वाघोली डेपोतील चालकांनी संप मागे न घेतल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०२३ चे कलम २ चा खंड ()चा उपखंड (एक) व (पाच) यासह कलम ४ चे पोट-कलम () मधील तरतुदीच्या अधीनराहून या कंत्राटी चालक कर्मचाऱ्यांच्या संपास दिनांक २६ ऑगस्ट २०२३ पासून मनाईकरण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासनाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. असे पीएमपी कडून सांगण्यात आले.


News Title | PMPML Contractor Strike | PMPML says strike has no impact on bus services