PMP Students pass | पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वी च्याविद्यार्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास

HomeपुणेBreaking News

PMP Students pass | पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वी च्याविद्यार्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास

गणेश मुळे Jun 08, 2024 12:09 PM

PMP’s e-bus depot | पीएमपीच्या ई-बस डेपोचे शुक्रवारी उद्‌घाटन | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
PMPML : Prakash Dhore : पीएमपी प्रशासनाच्या कारभारा विरोधात दस्तरखुद्द पीएमपी संचालक करणार आंदोलन 
PMPML : कंपनी सेक्रेटरींना PMP चा ‘मोह’ सुटेना! : कालावधी संपून तीन महिने उलटूनही पाय निघेना 

PMP Students pass | पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वी च्याविद्यार्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास

पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी चे विद्यार्थ्यांना ७५% अनुदानित मोफत बस प्रवास पास

PMPML Pass – (The Karbhari News Service) – ​सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षाकरिता पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वी चे विद्यार्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी चे विद्यार्थ्यांना ७५% सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरू करण्यातआली आहे. पीएमपी प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. (PMPML Pune)

​पासेससाठी  १२ जून पासून अर्जाचे वाटप सर्व आगारामधून व सर्व पासकेंद्रावर करण्यात येणार आहे. तसेच भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील विदयार्थ्यांकरिताचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रित रित्या घेवून जाऊ शकतात. तसेच सदरचे अर्ज भरून एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. महामंडळाने दिलेले ते सर्व पास शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही.

​खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पासचे रकमेचे २५% रक्कमेनुसारचे चलन तयार करून देणेत येईल ते चलन विद्यार्थ्यांनी पुणे मनपा हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्र चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्जासोबत चलन व आवश्यक कागदपत्रे जोडून जवळच्या आगारांमध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. तसेच सदरचे पासेसकरीताचे अर्ज वितरण दि. १२/०६/२०२४ पासून महामंडळाच्या सर्व आगारामधून करण्यात येईल.

​प्रस्तुत योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारामध्ये उपलब्ध आहे. तरी पुणे मनपाचे शाळेतील व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

​अधिक महितीसाठी संपर्क क्र. ०२०-२४५४५४५४.