पीएमपीने बीआरटी बसस्थानकामधील सुरक्षारक्षकांची नियुक्ती थांबवली
| आर्थिक कारणास्तव पीएमपीचा धोरणात्मक निर्णय
पुणे |. पुणे महानगरपालिका (PMC Pune) हद्दीमध्ये संगमवाडी ते विश्रांतवाडी, येरवडा ते आपले घर आणि स्वारगेट ते कात्रज या बीआरटी मार्गामध्ये (BRTS Route) परिवहन महामंडळामार्फत (PMPML) बीआरटी बसेसचे संचलन सुरू आहे. या मार्गावर सुरक्षारक्षक (Security Guard) नेमण्यात आले होते. मात्र आर्थिक बोजा सहन होत नसल्याने पीएमपी कडून सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार नाहीत. याबाबतचा धोरणात्मक निर्णय (Policy) पीएमपी कडून घेण्यात आला आहे.
बीआरटी मार्गामधील बसस्थानकामधील विद्युत उपकरणे, स्वयंचलित दरवाजे, यूपीएस आणि बॅटरी संच यांच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता परिवहन महामंडळामार्फत तीन शिफ्टमध्ये खाजगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. तथापि सद्यथितिमध्ये अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे आदेशानुसार १ डिसेंबर पासून सर्व बीआरटी बसस्थानकामधील खाजगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती थांबविण्याचा धोरणात्मक
निर्णय घेण्यात आलेला आहे.