PMC Zonal Medical Officer Promotion | परिमंडळ आरोग्य अधिकारी पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात! | अनुभवाच्या अटीवरून आक्षेप 

Homeadministrative

PMC Zonal Medical Officer Promotion | परिमंडळ आरोग्य अधिकारी पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात! | अनुभवाच्या अटीवरून आक्षेप 

Ganesh Kumar Mule Nov 03, 2025 7:22 PM

Personal Loan | पर्सनल लोन घेतल्याने तुम्हाला किती फायदा आणि किती तोटा होतो?  | ही बातमी वाचा आणि तुम्हीच ठरवा
Gas subsidy | Petrol-diesel price | पेट्रोल डिझेल नंतर घरगुती गॅस वरही सबसिडी | किती जाणून घ्या!
Kasba Constituency | ‘कोणीही अनाधिकृत फ्लेक्स लावू नका’, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन !

PMC Zonal Medical Officer Promotion | परिमंडळ आरोग्य अधिकारी पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात! | अनुभवाच्या अटीवरून आक्षेप

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आरोग्य विभागातील परिमंडळ आरोग्य अधिकारी पदाची पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पदासाठी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाच्या ८ वर्षाच्या अनुभवाची अट आहे. मात्र हे पद महापालिका सेवा नियमावलीत नाही. त्यामुळे यावर आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी  आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी महापलिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान या पदासाठी उद्या बढती समितीची बैठक होणार आहे. यात प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Pune Municipal Corporation  Health Department)

 

परिमंडळ आरोग्य अधिकारी पदासाठी नेमणुकीची पद्धत काय आहे?

 

परिमंडळ आरोग्य अधिकारी – एस-२३ – पदोन्नती – १००%

नेमणूकी करिता अर्हता व नेमणुकीची पद्धत

१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.B.B.S पदवी.
२) मनपा आस्थापनेवर कार्यरत असणान्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदांच्या कामाचा ८ वर्षांचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यामधून सेवाज्येष्ठतेने.

 

 

वैद्यकीय अधिकारी यांनी काय घेतले आहेत आक्षेप? 

पुणे महानगरपालिका आरोग्य विभागात परिमंडळ आरोग्य अधिकारी वर्ग १ या पदाची पदोन्नती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाच्या ८ वर्षाच्या अनुभवाची अट आहे. आरोग्य विभागाने तात्पुरत्या प्रसिद्ध केलेल्या सेवा ज्येष्ठता यादीमध्ये असलेल्या यादीमध्ये क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाचाच अनुभव गृहीत धरला नसून इतर परिमंडळ वैद्यकीय अधिकारी या पदाचाही अनुभव गृहीत धरला आहे. आक्षेपा नंतरची सेवाज्येष्ठता यादीही सर्वांना उपलब्ध झालेली नाही. क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी हे पद आरोग्य विभागाच्या R.R.मध्ये नसतानाही या पदाची सेवाज्येष्ठता आरोग्य विभागाने लावलेली आहे. पुणे मनपाच्या विविध खात्याची सेवाज्येष्ठता हि सा.प्र. विभागामार्फत प्रदर्शित केली जाते. असे असतानाही आरोग्य विभागाने क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या आरोग्य विभागाने क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या आरोग्य विभागाच्या R. R मध्ये नसलेल्या प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रदर्शित केली आहे.

–  पारदर्शी पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया पार पाडा

तक्रारीत पुढे म्हटले आहे कि, प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन यांनी देखील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी हे पद आरोग्य विभागाच्या R. R मध्ये नसल्याचे नमूद केलेले आहे. महाराष्ट्र शासनाकडील  अधिसूचना २००० नुसार MBBS. व BAMS वैद्यकीय अधिकारी यांना समकक्ष ग्राह्य धरण्यात आले असूनही ध्ये फक्त M.B.B.S अर्हता ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यामुळे BAMS वैद्यकीय अधिकारी यांच्यावर अन्याय झाला आहे. महापालिका आयुक्त यांनी नगर सचिव विभागास क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाचा किमान ५ वर्षाचा अनुभव अशी अट घातलेली असतांना शासन निर्णयामध्ये मात्र क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाचा ८ वर्षाचा अनुभव अशी अट घातलेली दिसून येत आहे. सदर बदल हा केवळ काही अधिकाऱ्यांनाचा पदोन्नतीचा लाभ मिळावा. म्हणून केल्याचे दिसून येत आहे.  प्रारूप सेवाज्येष्ठता यादीमध्ये क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाव्यतिरिक्त इतर पदांचाही ( जसे की परिमंडळ वैद्यकीय अधिकारी) अनुभव ठराविक अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी ग्राह्य धरण्यात आला आहे.
प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केल्यानंतर आक्षेप नोंदविण्यास कळविण्यात आले होते. परंतु दाखल केलेल्या आक्षेपांचा कोणताही विचार न करता अद्याप पर्यंत अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध न करता परिमंडळ आरोग्य अधिकारी या पदासाठीची पदोन्नती प्रक्रिया ठराविक अधिकाऱ्यांना लाभ मिळून देण्याच्या हेतून रेटली जात आहे. त्यामुळे पदोन्नती प्रक्रिया पारदर्शी पाने पार पाडावी, अशी मागणी आरोग्य अधिकारी यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: