PMC Zonal Medical Officer | आरोग्य विभागातील ५ अधिकाऱ्यांना परिमंडळ वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती! | मुख्य सभेची देखील मंजुरी
| बढती समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावाला मंजुरी
PMC Officers Promotion – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आरोग्य विभागाकडील ५ वैद्यकीय तथा निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना परिमंडळ वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. बढती समितीने नुकतीच ५ अधिकाऱ्यांची शिफारस केली होती. त्यानुसार महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मुख्य सभे समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. (PMC Health Department)
वैद्यकीय आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही पदोन्नती देताना क्षेत्रीय कार्यालयाकडील ८ वर्षाचा कामाचा अनुभव गृहीत धरला असून सेवा ज्येष्ठतेने पात्र करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
हे आहेत पदोन्नती मिळालेले ५ अधिकारी
१. रेखा गलांडे
२. अमित शहा
३. संतोष मुळे
४. स्वाती खाटपे (केतकी घाटगे)
५. दिपक पखाले
| पदोन्नती प्रक्रिया अडकली होती वादाच्या भोवऱ्यात
पुणे महापालिका आरोग्य विभागातील परिमंडळ आरोग्य अधिकारी पदाची पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या पदासाठी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाच्या ८ वर्षाच्या अनुभवाची अट देण्यात आली होती. मात्र हे पद महापालिका सेवा नियमावलीत नाही. त्यामुळे यावर आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी आक्षेप घेतला होते. याबाबत त्यांनी महापलिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. (Pune Municipal Corporation Health Department)
दरम्यान या पदासाठी ४ नोव्हेंबर बढती समितीची बैठक झाली होती. या बैठकीत आलेल्या तक्रारीवर म्हणजे अनुभवाच्या अटीवर चर्चा झाली. त्यामुळे महापालिका आयुक्त यांनी यावर सविस्तर अभ्यास करून आणि गरज भासल्यास सेवा नियमावलीत दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने सुधारणा करून या बाबतचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

COMMENTS