Video | PMC Water Tank  | Datta Bahirat Patil | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन |उद्घाटना नंतर धक्काबुक्की! 

HomeBreaking Newsपुणे

Video | PMC Water Tank  | Datta Bahirat Patil | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन |उद्घाटना नंतर धक्काबुक्की! 

गणेश मुळे Jan 26, 2024 12:04 PM

Relief to the citizens of 34 included villages! Important decision of the state government!
World-class facilities should be provided to passengers through the new terminal of the pune airport |  Deputy Chief Minister Ajit Pawar
Iftar Party | सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक | अजित पवार | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

PMC Water Tank  | Datta Bahirat Patil | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन |उद्घाटना नंतर धक्काबुक्की!

| श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट | माजी नगरसेवक दत्ता बहिरट

 

PMC Water Tank  | Datta Bahirat Patil |पुणे : काँग्रेस आणि महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) प्रभाग क्रमांक ११ (PMC Ward no 11)  येथील आशा नगर (PMC Ashanagar Water Tank) येथील माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभाचे उदघाटन काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. दरम्यान उद्घाटन झाल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ranindra Dhangekar), मोहन जोशी  (Mohan Joshi Pune congress) तसेच काही पत्रकारांना धक्का बुक्की झाल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान या प्रकारामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी उद्घाटनास येण्यास टाळल्याचे दिसून आले. (PMC Water Tank  | Datta Bahirat Patil)

See Video Here|https://www.instagram.com/reel/C2kAhQwNxoO/?utm_source=ig_web_copy_link

याप्रसंगी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर, माजी मंत्री रमेश बागवे, दीप्ती चवधरी, संजय बालगुडे, अभय छाजेड, विरेंद्र किराड, अविनाश बागवे, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, उदय महाले, राहुल शिरसाट आदी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक रहिवाशांच्या प्रतिसादाने कार्यक्रम उत्साहात पार पडला.

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या सहकार्याने पाण्याच्या टाकीची उभारणी मी करू शकलो. भारतीय जनता पक्षाचे आमदार यांचा कामाचा श्रेय घेण्याचा प्रकार त्यांच्या अंगलट आला. रहिवाशांनी त्यांना दाद दिली नाही. यापुढे विकास कामात काँग्रेस आघाडीवर राहील, असे यावेळी बोलताना माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी सांगितले.

पाण्याच्या टाकीसाठी बहिरट यांनी प्रयत्न केले हे सर्वाँना माहीत आहे. काँग्रेसच्या कामाचे श्रेय घेण्याचा खटाटोप भाजप करीत आले आहे. पण लोकांकडून त्यांना प्रतिसाद मिळेनासा झाला आहे, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टाकीसाठी विना मोबदला जागा बहिरट यांनी मिळवून दिली. लोकांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने हे घडले, असे आमदार धंगेकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या मुख्य सभेने टाकीचे उदघाटन कसे करावे? हे ठरवून दिले होते, परंतु, भाजपच्या आमदारांनी टाकीसाठी काहीही न करता उदघाटनाचा घाट घातला आहे, हे सर्व जनता ओळखून आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील जनतेला दत्ता बहिरट यांच्या कामाची चांगली माहिती आहे. जनता बहिरट यांच्यावर विश्वास ठेवेल, असे बागवे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात ॲड.शाबीर खान, विनोद रणपिसे, उदय वाघ, प्रविण डोंगरे, आशुतोष जाधव, अजित जाधव, राजेंद्र भुतडा, रमेश पवळे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, राजश्री ताई अडसूळ, संगीता ताई रूपटक्के, राजन नायर, भरत ठाकूर, कुणाल काळे, प्रसाद वाघमारे, स्वप्नील नाईक, साहिल राऊत, प्रथमेश लभडे, वाल्मिकी जगताप, जावेद नीलगर, विनोद बांदल, सनी यादव आदी महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.