PMC Water Supply Department | पाणीपुरवठा विभागाने पुणेकरांना केले हे आवाहन 

Homeadministrative

PMC Water Supply Department | पाणीपुरवठा विभागाने पुणेकरांना केले हे आवाहन 

Ganesh Kumar Mule Jul 03, 2025 4:27 PM

PMC Water Supply Department | नागरिकांच्या टॅक्सच्या रकमेतून वाढीव बिलाची रक्कम देणे अन्यायकारक | पुणे महापालिकेचे या विभागाला खरमरीत पत्र!
Pune Water Cut Update | पावसाच्या ओढीने पुणे शहरात लवकरच एक दिवसाआड पाणी!
Heavy Rain in pune | बाहेर पडताना काळजी  घ्या | खडकवासला धरणातून 30 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग

PMC Water Supply Department | पाणीपुरवठा विभागाने पुणेकरांना केले हे आवाहन

 

Nandkishor Jagtap PMC – (The Karbhari News Service) – सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पहिल्या पावसामध्ये पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात माती वाहून येत असल्याने धरणाच्या पाण्यामध्ये नेहमीपेक्षा गढूळपणा हा जादा आहे. नव्याने समाविष्ट गावांमध्ये उदा. नांदेड, नांदोशी, किरकीटवाडी, खडकवासला, सणसनगर, धायरी, नऱ्हे या भागामध्ये सदर पाणी प्रक्रिया न करता, फक्त निर्जंतुकीकरण करून पुरविण्यात येते. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि सदर पाणी तुरटीचा वापर करून, निवळून आणि उकळून त्याचा वापर करण्यात यावा. असे आवाहन नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा विभाग) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

तसेच, शहराच्या इतर भागांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रामधून सर्व आवश्यक शुद्धीकरण प्रक्रिया करून पाणी पुरविण्यात येत असले तरी देखील काही वेळेस जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्यातील गढूळपणा कमी करण्यासाठीच्या क्षमतेपेक्षा जादा गढूळ पाणी असल्यास नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये देखील अल्प प्रमाणात गढूळता राहते. अशा परीस्थितीत देखील नागरिकांनी पाणी तुरटीचा वापर करून, निवळून आणि उकळून त्याचा वापर पिण्यासाठी करणेबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0