PMC Water Supply Department | पाण्यासारखा पैसा खर्च होऊनही सात वर्षांपासून समान पाणीपुरवठा योजना अजूनही रखडलेलीच!

Homeadministrative

PMC Water Supply Department | पाण्यासारखा पैसा खर्च होऊनही सात वर्षांपासून समान पाणीपुरवठा योजना अजूनही रखडलेलीच!

Ganesh Kumar Mule Feb 18, 2025 3:42 PM

PMC Pune Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी उद्या कार्यशाळा | प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त राहणार उपस्थित
Agricultural University Vs PMC Pune | .. म्हणून कृषी विद्यापीठाने पुणे महापालिकेला दिला कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा!
PMC Call Center | Command and Control Center | कमांड सेंटर चा निधी कॉल सेंटर च्या कामासाठी!

PMC Water Supply Department | पाण्यासारखा पैसा खर्च होऊनही सात वर्षांपासून समान पाणीपुरवठा योजना अजूनही रखडलेलीच!

 

PMC Equal Water Supply Project – (The Karbhari News Service) – समान पाणीपुरवठा योजनेवर ( अमृत योजना धरून) आजवर दीड हजार कोटी रुपये खर्च करून झाले आहेत. मूळ कंत्राटाप्रमाणे या प्रकल्पाचं काम मार्च २०२२ मध्येच संपणं अपेक्षित होते. स्कोप २५% नी कमी करूनही हे काम मार्च २०२६ पर्यंत रेंगाळणार असं दिसतंय. असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

वेलणकर यांनी या बाबत सांगितले कि, मोठा गाजावाजा होऊन पुणे शहराला २४ * ७ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणारी पावणे तीन हजार कोटी रुपयांची योजना फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरु झाली. ही योजना पूर्ण झाल्यावरही २४ * ७ पाणीपुरवठा करणे अशक्य आहे हे आम्ही नजरेला आणून दिल्यानंतर हळूच या योजनेचे नांव बदलून ते *समान पाणीपुरवठा योजना* असे केले गेले. पाईप लाईन आणि मीटर्स बसवण्यासंदर्भात कामाचा मूळ स्कोप २५% ने कमी करुनही अनेकदा मुदतवाढ देऊनही आज रोजी ८० % काम जेमतेम पूर्ण झाले आहे.‌ (Pune PMC News)

 

या योजनेच्या सद्यस्थितीची माहिती माहितीच्या अधिकारात घेतली असता खालील गोष्टी निदर्शनास आल्या. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

१) अमृत योजनेतून अडीचशे कोटी रुपये मिळवून फेब्रुवारी २०१८ मध्ये टाक्या बांधायला सुरुवात झाली. आज ७ वर्षे झाल्यावरही एकूण ८६ टाक्यांपैकी आज रोजी सहा वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ६० टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. सर्व टाक्यांचे काम पूर्ण होण्यास मार्च २०२६ उजाडेल अशी स्थिती आहे.‌

२) पेठांमधील काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असताना आज रोजी फक्त ६७% मीटर्स बसले असून पाईप लाईन चे काम ८४% पूर्ण झाले आहे. या कामाला जून २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळणे अपेक्षित आहे.

३) लोहगाव, धानोरी, कळस या भागातील कामाची सद्यस्थिती बघता ९३% काम पूर्ण झाले असून या कामाला जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

४) वारजे भागात ८२% मीटर्स बसले असून पाईप लाईन चे काम ९७% पूर्ण झाले आहे. या कामाला नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

५) कॅन्टोन्मेंट भागात फक्त ५१% मीटर्स बसले असून पाईप लाईन चे काम फक्त ११% पूर्ण झाले असून या कामाची मुदत मे २०२६ पर्यंत आहे.‌

६) वडगांव भागात ८७% मीटर्स बसले असून ९७% पाईप लाईन चे काम पूर्ण झाले आहे. कामाची वाढविलेली मुदत ३१/१२/२०२५ आहे.

७) ट्रान्समिशन लाईन्स चे काम ८७% पूर्ण झाले आहे आणि या कामाला ३०/०६/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
——

या समान पाणीपुरवठा योजनेवर ( अमृत योजना धरून) आजवर दीड हजार कोटी रुपये खर्च करून झाले आहेत. मूळ कंत्राटाप्रमाणे या प्रकल्पाचं काम मार्च २०२२ मध्येच संपणं अपेक्षित होते. स्कोप २५% नी कमी करूनही हे काम मार्च २०२६ पर्यंत रेंगाळणार असं दिसतंय . पुण्यात पाणीगळती ४०% आहे आणि ती कमी करण्यासाठी ही समान पाणीपुरवठा योजना आणण्यात आली आहे.‌ एकीकडे जलसंपदा खातं पुण्यातील जादा पाणी वापरावर दंडात्मक बिल आकारणी करतंय आणि याला उत्तर म्हणून ज्या समान पाणीपुरवठा योजनेकडे बोट दाखवलं जातं आहे ती मात्र वर्षानुवर्षे रेंगाळतीये हे अत्यंत खेदजनक आहे

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0