PMC Ward Structure | महायुतीतील माजी नगरसेवक व कार्यकर्ते यांचा प्रभाग रचनेत हस्तक्षेप | कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाचा आरोप 

HomeBreaking News

PMC Ward Structure | महायुतीतील माजी नगरसेवक व कार्यकर्ते यांचा प्रभाग रचनेत हस्तक्षेप | कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाचा आरोप 

Ganesh Kumar Mule Jun 25, 2025 7:29 PM

CFC | Property Tax | मिळकत करावरील शास्ती टाळा | सुट्टीच्या दिवशी ही टॅक्स भरणा करण्यासाठी CFC राहणार सुरु 
Pu La Deshpande Udyan Pune | पु. ल. देशपांडे उद्यानात आजपासून महिला बचत गट खाद्य महोत्सव
PMC Social Devlopment Department | पुणे महापालिकेच्या 25 कल्याणकारी योजना | लाभ घेण्यासाठी सविस्तर माहिती जाणून घ्या

PMC Ward Structure | महायुतीतील माजी नगरसेवक व कार्यकर्ते यांचा प्रभाग रचनेत हस्तक्षेप | कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाचा आरोप

 

PMC Election – (The Karbhari News Service) – सत्ताधारी महायुतीतील काही माजी नगरसेवक व कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणून प्रभाग रचनेच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. असा आरोप कॉंग्रेस चे माजी नगरसेवक संजय बालगुडे (Sanjay Balgude Congress)  यांनी केला आहे. तसेच याबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी बालगुडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation Election)

बालगुडे यांच्या निवेदनानुसार  पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे यामध्ये प्रभाग रचना करण्यासाठी निवडणूक आयोगाने आदेश दिले आहे निवडणूक कायद्याप्रमाणे प्रभाग रचना करताना नदी नाले डोंगर व रेल्वे लाईन महत्त्वाचे मुख्य रस्ते याला धरून प्रभाग रचना करण्याची तरतूद आहे

परंतु नुकतेच लोकसंख्या लक्षात घेऊन प्रभाग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, आमच्या माहितीप्रमाणे सत्ताधारी महायुतीतील काही माजी नगरसेवक व कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणून प्रभाग रचनेच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. त्यांच्या दृष्टीने जे सोयीचे आहे त्या पद्धतीने प्रभाग रचना करण्याचे प्रयत्न चालू आहे हे घटनेच्या विरुद्ध आहे लोकशाहीला घातक आहे

सन 2017 निवडणुकीच्या वेळी सुद्धा असे प्रकार घडले असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला होता व याबाबत तक्रारी सुद्धा दाखल केलेल्या होत्या. सन 2022 मध्ये निवडणूक घोषणा झाल्यानंतर असे प्रकार घडलेले आहेत व याबाबत कोर्टात व निवडणूक आयोगाकडे तक्रारी सुद्धा दाखल झालेल्या आहेत. आपण स्वतः या निवडणूक प्रक्रियेमध्ये लक्ष घालून निवडणूक आयोग व निवडणूक कायद्याप्रमाणे प्रभाग रचना होईल असे पाहावे व कोणाही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असणार नाही याची काळजी घ्यावी. असे बालगुडे यांनी म्हटले आहे.