PMC Ward  7 – Gokhlenagar Wakadewadi | प्रभाग क्रमांक ७ – गोखलेनगर वाकडेवाडी  | पाटील इस्टेट पासून ते पत्रकार नगर पर्यंत आहे या प्रभागाची व्याप्ती  | जाणून घ्या सविस्तर 

Homeadministrative

PMC Ward  7 – Gokhlenagar Wakadewadi | प्रभाग क्रमांक ७ – गोखलेनगर वाकडेवाडी  | पाटील इस्टेट पासून ते पत्रकार नगर पर्यंत आहे या प्रभागाची व्याप्ती  | जाणून घ्या सविस्तर 

Ganesh Kumar Mule Aug 28, 2025 8:58 PM

All Sets High School 10th Results | ऑल सेट्स हाय स्कूल चा दरवर्षीप्रमाणे 100% टक्के निकाल!
PMPML Ticket Price Hike | पीएमपीच्या सुधारित तिकीट दराची अंमलबजावणी १ जून पासून | पीएमपी प्रशासनाचा निर्णय 
GB Syndrome in Pune | GBS च्या प्रकरणांवर त्वरित मोफत उपचार व जलप्रदूषण रोखण्याची काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी

PMC Ward  7 – Gokhlenagar Wakadewadi | प्रभाग क्रमांक ७ – गोखलेनगर वाकडेवाडी  | पाटील इस्टेट पासून ते पत्रकार नगर पर्यंत आहे या प्रभागाची व्याप्ती  | जाणून घ्या सविस्तर

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – गोखलेनगर वाकडेवाडी या प्रभागाने शहरातील बराचसा भाग व्यापला आहे. जवळपास ९० हजार लोकसंख्येचा हा प्रभाग  आहे. शिवाजीनगर, डेक्कन परिसर असे विभिन्न भाग या प्रभागात येत आहेत. चला तर या प्रभागाची सविस्तर माहिती जाणून घेऊया. (Pune Corporation Election 2025)

 

प्रभाग क्रमांक ७ – गोखलेनगर वाकडेवाडी

लोकसंख्या एकूण – ८९९५७ –  – अ. जा. १५०६७ – अ. ज. १६०४

निवडून द्यायच्या सभासदांची संख्या – ४

 

व्याप्ती: पाटील इस्टेट, भोसले नगर, अशोक नगर, कमल नयन बजाज उद्यान, साखर संकुल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, वाकडेवाडी. संगमवाडी गावठाणा व्यतिरिक्त संगमवाडीचा भाग मुळा रोड, भैया वाडी, इंदिरा गांधी वसाहत, जगदीश नगर, गोखलेनगर, जनवाडी, चर्तुश्रृंगी माता मंदिर, चर्तु श्रृंगी परिसर, पंचवटी-पाषाण सकाळ नगर, अभिमानश्री सोसायटी शासकीय तंत्र निकेतन, खैरेवाडी, ICS कॉलनी, गजानन महाराज उद्यान, वन भवन, पत्रकार नगर डेक्कन कॉलेज इ.

उत्तर: ए.आर.डी.ई. ची पूर्वेकडील हद्द डॉ. होमी भाभा रस्त्यास (पाषाण रस्त्यास) जेथे मिळते. तेथून पूर्वेस डॉ. होमी भाभा रस्त्याने NCL च्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर हद्दीने बाणेर रस्ता ओलांडून पुढे उत्तरेस निलगिरी लेनने इंदिरा गांधी वसाहतीच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने व पुढे यशदाच्या पश्चिमेकडील रस्त्याने बाणेर रस्त्यास मिळेपर्यंत. बाणेर रस्त्याने आचार्य आनंद ऋषिजी महाराज चौकात (पुणे विद्यापीठ चौक) पुणे विद्यापीठाच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तर पूर्वेस सदर हद्दीने खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीने मुळा नदी ओलांडून व पुढे उत्तरेस आळंदी रस्त्याने कै. सदाशिव रामभाऊ निकम रस्त्यास (लूप रस्त्यास) मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने येरवडा हॉट मिक्स प्लांट च्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत.

पूर्व : कै. सदाशिव रामभाऊ निकम रस्ता येरवडा हॉट मिक्स प्लांट च्या पश्चिमेकडील रस्त्यास जेथे मिळतो तेथून दक्षिणेस येरवडा हॉट मिक्स प्लांट च्या पश्चिमेकडील रस्त्याने डेक्कन कॉलेज रस्ता ओलांडून पुढे दक्षिणेस योजना पोल्ट्री फार्मच्या पश्चिमेकडील नाल्याने मुळा मुठा नदीस मिळेपर्यंत.

दक्षिण: मुळा-मुठा नदी योजना पोल्ट्री फर्मच्या पश्चिमेकडील नाल्यास जेथे मिळते तेथून पश्चिमेस मुळा नदीने पाटील इस्टेटच्या दक्षिणेकडील रस्त्यास संगमवाडी पूलावर मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने जुन्या पुणे मुंबई रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिण पूर्वेस पुणे मुंबई रस्त्याने अभियांत्रिकी महाविद्यालय चौकात एच. के. फिरोदिया पूलावरील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने संचेती हॉस्पिटल जवळ पुणे-मुंबई रेल्वे लाईनला मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रेल्वे लाईनने शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने साखर संकुलच्या पूर्वेकडील के. बी. जोशी पथास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने वीर चाफेकर चौकात पुणे विद्यापीठ रस्त्यास (गणेशखिंड रस्त्यास) मिळेपर्यंत. तेथून पूर्वेस पुणे विद्यापीठ रस्त्याने गोखले रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने पानकुंवर फिरोदिया रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने सेनापती बापट रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सेनापती बापट रस्त्याने बालभारतीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून दक्षिणे पश्चिमेस बालभारतीच्या पश्चिमेकडील हद्दीने व पुढे मौजे एरंडवणा व मौजे शिवाजीनगर (भांबुर्डा) यांच्या सामाईक हद्दीने मौजे पाषाणच्या हद्दीस वेताळ टेकडीजवळ मिळेपर्यंत.

पश्चिमः मौजे शिवाजीनगर (भांबुर्डा). मौजे एरंडवणा यांची सामाईक हद्द वेताळ टेकडीजवळ मौजे पाषाणच्या हद्दीस जेथे मिळते. तेथून उत्तरपश्चिमेस मौजे पाषाण व मौजे शिवाजीनगर (भांबुर्डा) यांचे सामाईक हद्दीने व पुढे मौजे एरंडवणा आणि मौजे पाषाण यांच्या हद्दीने ए. आर.डी. ई च्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस ए. आर. डी. ई च्या पूर्वेकडील हद्दीने डॉ. होमी भाभा रस्त्यास मिळेपर्यंत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0