PMC Ward 38 – Ambegaon Katraj | प्रभाग क्रमांक ३८ – आंबेगाव कात्रज | या प्रभागात ५ सदस्य असणार आहेत | प्रभागाची रचना आणि व्याप्ती जाणून घ्या सविस्तर

Homeadministrative

PMC Ward 38 – Ambegaon Katraj | प्रभाग क्रमांक ३८ – आंबेगाव कात्रज | या प्रभागात ५ सदस्य असणार आहेत | प्रभागाची रचना आणि व्याप्ती जाणून घ्या सविस्तर

Ganesh Kumar Mule Sep 13, 2025 9:02 AM

PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी पदी  पदोन्नती
Congess Pune | काँग्रेसच्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानामुळे भारत देश हा सुदिन पाहत आहोत | अरविंद शिंदे
MP Supriya Sule | ‘त्या’ शिक्षकाच्या कुटुंबाला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार

PMC Ward 38 – Ambegaon Katraj | प्रभाग क्रमांक ३८ – आंबेगाव कात्रज | या प्रभागात ५ सदस्य असणार आहेत | प्रभागाची रचना आणि व्याप्ती जाणून घ्या सविस्तर

 

PMC Draft Ward Structure 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील प्रभाग क्रमांक ३८  म्हणजे आंबेगाव कात्रज हा ५ सदस्यांचा प्रभाग असणार आहे. बाकी ४० प्रभाग हे ४ सदस्यांचे असणार आहेत. या प्रभागासाठी २०० हरकती आल्या आहेत. यात काही बदल केले जाणार आहेत का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान या प्रभागाची रचना आणि हद्दी आणि सविस्तर जाणून घेऊयात.  (Pune Municipal Corporation – PMC Election 2025)

 

प्रभाग क्रमांक ३८ – आंबेगाव कात्रज

लोकसंख्या एकूण- ११४९७० – अ. जा. १२६९७ – अ. ज. १८४६

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ५

 

व्याप्ती: कात्रज, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, संतोष नगर, शनीनगर, वेताळनगर, मोकारवाडी, अंजनीनगर, धनकवडी बालाजी नगर (पार्ट), कात्रज तलाव, स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय, लेक व्हिस्टा सोसायटी. एम. एस. आर. ऑलिव्ह सोसायटी, दत्त नगर परिसर, आंबेगाव बु., चंद्रभागा नगर फाले नगर, होळकर नगर, गुजर निंबाळकर वाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, कात्रज अंजनी नगर, सुखसागर नगर (पार्ट) इ.

उत्तर: मौजे आंबेगाव बुद्रुक व नन्हे यांच्या हद्दीवरील नाला कात्रज देहूरोड बायपास रस्त्यास जेथे मिळतो तेथून पूर्वेस कात्रज देहूरोड बायपास रस्त्याने आंबेगाव पठार रस्त्यास (मौजे आंबेगाव बुद्रुकमधील स. नं. २९ ची पश्चिमेकडील हद्द) मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने Atmosphere Apartment च्या उत्तरे कडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने व पुढे श्री हरी हाईट्स इमारतीच्या उत्तरेकडील हद्दीने पणन मंडळ सोसायटीच्या पश्चिमेकडील दक्षिणोत्तर हद्दीच्या सरळ रेषेस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर सरळ रेषेने पणन मंडळ सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर हद्दीने एस. पी. इंटरनॅशनल शाळेच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस एस. पी. इंटरनॅशनल शाळेच्या पूर्वेकडील रस्त्याने श्रीरामनगर मधील लेन नं.२ ला मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने मौजे धनकवडी व मौजे आंबेगाव बुद्रुक यांच्या हद्दीवरील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस आंबेगाव बुद्रुक व धनकवडी यांच्या हद्दीवरील रस्त्याने पीआयसीटी येथील त्रिमूर्ती चौकात मौजे कात्रज व मौजे आंबेगाव बुद्रुक यांचे हद्दीवरील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने कात्रज देहूरोड बायपास रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून पूर्वेस कात्रज देहूरोड बायपास रस्त्याने पुणे सातारा रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस पुणे सातारा रस्त्याने खुशबू हॉटेल जवळ सिद्धी हॉस्पिटलच्या दक्षिणेकडील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने व सदर रस्त्याच्या सरळ रेषेने आंबील ओढ्यास मिळेपर्यंत.

पुर्वः सिद्धी हॉस्पिटलच्या दक्षिणेकडील पूर्व पश्चिम रस्त्याची सरळ रेषा आंबील ओढ्यास जेथे मिळते. तेथून दक्षिणेस आंबील ओढ्याने लेक टाऊन सोसायटीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस लेक टाऊन सोसायटीच्या पूर्वेकडील आंबील ओढ्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर हद्दीने (देवयानी रेसिडेन्सी सोसायटीच्या दक्षिणेकडील हद्द) पुष्पा इंटरनॅशनल शाळेच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत (विघ्नहर्ता मेडिकल स्टोअर जवळ) तेथून उत्तरेस सदर रस्त्याने पुष्पा इंटरनॅशनल शाळेच्या दक्षिणेकडील हद्दीवरील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने व पुढे रामराज्य प्राथमिक शाळेच्या दक्षिणेकडील हद्दीने व पुढे राजीव गांधी नगरच्या दक्षिणेकडील हद्दीने वीर बाजी पासलकर रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस वीर बाजी पासलकर रस्त्याने मौजे कात्रज व बिबवेवाडी यांच्या हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर हद्दीने पूर्वेस सीमासागर सोसायटीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर हद्दीने (सीमासागर सोसायटीच्या पूर्वेकडील हद्दीची सरळ रेषा आणि ग्रीन लॉन सोसायटीच्या पूर्वेकडील हद्द) सुखसागर नगर रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस मानसी अपार्टमेंटच्या पूर्वेकडील रस्त्यास (गल्ली नं. ३१) मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस Heera Plastic Industry च्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर हद्दीने अरिहंत रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने सागर उद्योगाच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर हद्दीने मनपा उद्यानाच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस आदीनाथ विहार इमारतीच्या पूर्वेकडील हद्दीच्या सरळ रेषेस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस हद्दीच्या सदर सरळ रेषेने आदीनाथ विहार इमारतीच्या दक्षिणेकडील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने कमला सिटी च्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथू दक्षिणेस सदर रस्त्याने भालचंद्र बंगल्याच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत. तेथून पश्चिमेस सदर हद्दीने लेन नं. १८ ओलांडून राजस सोसायटी मधील सदगुरू निवासच्या उत्तरेकडील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने निरंजन सोसायटीचा रस्ता ओलांडून ब्लुम सिटीच्या पश्चिमेकडील हद्दीच्या सरळ रेषेश मिळेपर्यंत, तेथून दक्षिण पश्चिमेस सदर हद्दीने व पुढे अष्टविनायक विहार सोसायटीच्या पश्चिमेकडील रस्त्याने आंबील ओढ्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस आंबील ओढ्याने कात्रज कोंढवा रस्ता ओलांडून उत्कर्ष नगरच्या दक्षिणेकडील नाल्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिण पूर्वेस सदर नाल्याने मौजे कात्रज व मौजे गुजर निंबाळकर वाडीच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस मौजे गुजर निंबाळकर वाडीच्या पूर्वेच्या हद्दीने आणि मौजे भिलारेवाडी गावाच्या पूर्वेकडील हद्दीने दक्षिणेकडील मनपा हद्दीस मिळेपर्यंत.

दक्षिणः मौजे भिलारेवाडी गावाची पूर्वेकडील हद्द मौजे भिलारेवाडी गावाच्या दक्षिणेकडील हद्दीस जेथे मिळते तेथून पश्चिमेस मौजे भिलारेवाडी गावाच्या दक्षिणेकडील मनपा हद्दीने मौजे कोळेवाडी गावाच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत.

पश्चिमः मौजे भिलारेवाडी गावाची दक्षिणेकडील मनपा हद्द मौजे कोळेवाडी यांच्या पूर्वेकडील हद्दीस जेथे मिळते तेथून उत्तरेस मौजे कोळेवाडी व मौजे जांभूळवाडी यांचे पूर्वेकडील हद्दीने व पुढे उत्तरेस मौजे आंबेगाव खुर्द मधील जुन्या वॉर्ड क्र. १च्या पूर्व व उत्तर हद्दीने मौजे नहे आणि मौजे आंबेगाव खुर्द यांचे सामाईक हद्दीने व पुढे उत्तरेस मौजे नन्हे गावाच्या पूर्वेकडील हद्दीने कात्रज देहूरोड रस्त्यास मिळेपर्यंत.

The Karbhari - Pune PMC Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: