PMC Ward 36 – Sahkarnagar Padmavati | प्रभाग क्रमांक ३६- सहकारनगर पद्मावती | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 

Homeadministrative

PMC Ward 36 – Sahkarnagar Padmavati | प्रभाग क्रमांक ३६- सहकारनगर पद्मावती | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Sep 12, 2025 8:17 AM

Supriya Sule Vs CM | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण 
PMC Ward 38 – Ambegaon Katraj | प्रभाग क्रमांक ३८ – आंबेगाव कात्रज | या प्रभागात ५ सदस्य असणार आहेत | प्रभागाची रचना आणि व्याप्ती जाणून घ्या सविस्तर
Online NOC for PMC Election 2025-26 | NOC साठी एकूण ४०५७ अर्ज | २४७ अर्ज बाद | ३७८३ अर्जदारांना ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र!

PMC Ward 36 – Sahkarnagar Padmavati | प्रभाग क्रमांक ३६- सहकारनगर पद्मावती | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या

 

PMC Draft Ward Structure 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका प्रारूप प्रभाग रचनेवर कालपासून सुनावणी सुरु आहे.  ही सुनावणी आज संपणार आहे. दरम्यान यातून नागरिकांनी सुचवलेले खरेच काही बदल होणार आहेत का, याबाबत सर्वाना उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या काही दिवसापासून आपण प्रत्येक प्रभागाची सविस्तर माहिती जाणून घेत आहोत, आपण आज सहकारनगर पद्मावती या प्रभागाची सविस्तर जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation – PMC Election 2025)

 

प्रभाग क्रमांक ३६- सहकारनगर पद्मावती

लोकसंख्या एकूण -८४६६० – अ. जा. – १९५९६ – अ. ज. -६१२

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या  – ४

 

व्याप्ती: गजलक्ष्मी सोसायटी, पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेट, गजानन महाराज मंदिर, तावरे कॉलनी, नाला गार्डन, पद्मावती मंदिर, बटरफ्लाय उद्यान, वि.स. खांडेकर विद्यालय, वाळवेकर नगर, संतनगर, गांधी ट्रेनिंग कॉलेज, सहकारनगर क्र. १ व २ तळजाई मंदिर, तळजाई वसाहत, रमणा गणपती, शाहू कॉलेज, तुळशीबागवाले कॉलनी, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, अष्टविनायक सोसायटी, शिवदर्शन, मुक्तांगण शाळा, पद्मावती, चव्हाण नगर, शंकर महाराज वसाहत, पंचवटी सोसायटी, विणकर सोसायटी, धनकवडी पठार, मेघदूत सोसायटी, स्प्रिंगहिल्स सोसायटी, कोणार्क विहार, तीन हत्ती चौक इ.

उत्तर: शाहू कॉलेजची पश्चिमेकडील हद्द पांचगांव पर्वतीच्या उत्तरेकडील हद्दीस जेथे मिळते तेथून उत्तरेस शाहू कॉलेजची पश्चिमेकडील हद्दीने व पुढे दक्षिणेस शाहू कॉलेजच्या पूर्वेकडील हद्दीने शाहू कॉलेज रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस शाहू कॉलेज रस्त्याने पुणे सातारा रस्त्यास मिळेपर्यंत.

पुर्वः शाहू कॉलेज रस्ता पुणे सातारा रस्त्यास जेथे मिळतो, तेथून दक्षिणेस पुणे सातारा रस्त्याने विष्णूपंत अप्पा जगताप रस्त्यास मिळेपर्यंत.

दक्षिण: पुणे सातारा रस्ता जेथे विष्णूपंत अप्पा जगताप रस्त्यास मिळतो तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने महात्मा ज्योतिबा फुले चौक (तीन हत्ती चौक) ओलांडून पुढे धनकवडी जुन्या मनपा हद्दीवरील रस्त्याने व पुढे त्रिमुर्ती हौसिंग सोसायटी व मॉर्डर्न सोसायटीच्या यांचेमधील रस्त्याने व पुढे हद्दीने पांचगांव पर्वतीच्या हद्दीस मिळेपर्यंत.

पश्चिमः त्रिमुर्ती हौसिंग सोसायटी व मॉर्डर्न सोसायटी यांचेमधील हद्द जेथे पांचगांव पर्वतीच्या हद्दीस मिळते, तेथून उत्तरेस मौजे पांचगांव पर्वती व मौजे धनकवडीच्या हद्दीने व पुढे मौजे पर्वती व पांचगांव पर्वतीच्या हद्दीने शाहू कॉलेजच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत.

 

The Karbhari - Pune PMC Election 2025

PMC Ward 36 – Sahkarnagar Padmavati Map

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: