PMC Ward 34 – Narhe Wadgaon Budruk | प्रभाग क्रमांक – ३४ – नऱ्हे – वडगाव बुद्रुक | या प्रभागासाठी सर्वात जास्त म्हणजे २ हजार हून अधिक हरकती का आल्या? जाणून घ्या या प्रभागाची व्याप्ती आणि रचना
Pune Corporation Election 2025 – (The Karbhari News Service) – वडगाव खुर्द पासून ते जांभूळवाडी तलाव पर्यंत या प्रभागाची व्याप्ती आहे. त्यामुळे नऱ्हे – वडगाव बुद्रुक या प्रभागासाठी सुमारे २०६६ हरकती आणि सूचना आल्या आहेत. प्रभागाची सविस्तर रचना आणि व्याप्ती आपण जाणून घेऊयात. (Pune PMC News)
प्रभाग क्रमांक – ३४ – नऱ्हे – वडगाव बुद्रुक
लोकसंख्या एकूण – ९२४४१ – अ. जा. -७५३२ – अ. ज. १३४३
निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४
व्याप्ती: वडगांव खुर्द, वडगांव बुद्रुक (पार्ट), वडगांव धायरी (पार्ट), अभिरुची ढाबा, सणस विद्यालय, रायकरनगर, सनसिटी, गणेश नगर, मधुकोष सोसायटी, राजयोग सोसायटी, दांगट पाटील नगर, व्यंकटेश वृंदावन सोसायटी, सुंदर गार्डन, खाडेवाडी, महादेव नगर, आंबेगाव बुद्रुक (भाग), नऱ्हे गाव, बालाजी नगर, श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, झील कॉलेज, जांभूळवाडी तलाव इ.
उत्तर: मौजे नांदेड व मौजे वडगांव खुर्दची हद्द मुठा नदीस जेथे मिळते तेथून उत्तर-पूर्वेस मुठा नदीने मौजे वडगांव बुद्रुक, मौजे वडगांव खुर्द यांचे हद्दीवरील नाल्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिण पूर्वेस सदर नाल्याने सिंहगड रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस पुणे सिंहगड रस्त्याने बायपास हायवे ओलांडून वडगाव बुद्रुक मधील नाल्यास नाहटा स्पोर्ट कॉम्प्लेक्स जवळ मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर नाल्याने दांगटपाटील मार्केट पॉइंट इमारतीच्या उत्तरेकडील हद्दीस (दांगट गार्डन इमारतीच्या उत्तरेकडील हद्द) मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने श्रीमती शेवंताबाई नामदेव दांगट मुलींचे प्राथमिक विद्यालयाची कमानीकडून येणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर कमान ओलांडून पुढे दक्षिण पूर्वेस साई आंगण इमारतीच्या दक्षिणेकडील पूर्वपश्चिम रस्त्याने कै. गंगाराम भाऊसाहेब दांगट (पाटील) उर्फ बबन पाटील चौक येथे साईबाबा मंदिराच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस स्व. महेंद्र दांगट पाटील स्मृती या इमारतीच्या तसेच कै.ह.भ.प. शांताबाई खंडेराव खडसरे दवाखान्याच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सरळहद्दीने व पुढे सदर हद्दीच्या सरळ रेषेने (स्व. महेंद्र दांगट पाटील स्मृती इमारतीची दक्षिणेकडील हद्द) स्वामी धान्य भांडार इमारतीच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर हद्दीने व पुढे दक्षिणेस न्युक्लिअस वल्ड स्कूल आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांच्या पश्चिमेकडील हद्दीने स्वप्नपूर्ती इमारत, चामुंडा इमारत, रामराज्य हाइटस इमारत यांच्या उत्तरेकडील रस्त्याच्या सरळ रेषेस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर सरळ रेषेने व पुढे रस्त्याने व पुढे पूर्वेस सदर रस्त्याच्या सरळ रेषेने सिंहगड दर्शन इमारतीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत, (जुन्या पाण्याच्या टाकीजवळ) तेथून दक्षिणेस सदर हद्दीने श्रीनाथ कॉम्प्लेक्स इमारतीच्या उत्तरेकडील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून पूर्वेस सदर रस्त्याने मौजे वडगाव बुद्रुक मधील एसकेएन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट च्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून पूर्वेस सदर रस्त्याने मौजे पाचगाव पर्वतीच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस व पुढे पूर्वेस मौजे पाचगाव पर्वतीच्या हद्दीने मौजे आंबेगाव बुद्रुक मधील स.न. २० च्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत.
पुर्व: मौजे आंबेगाव बुद्रुक मधील स.न.२० च्या पश्चिमेकडील हद्दीस पाचगाव पर्वतीचे दक्षिण हद्द जेथे मिळते तेथून दक्षिणेस मौजे आंबेगाव बुद्रुक मधील स.न. २१ ते २६ च्या पश्चिमेकडील हद्दीने मौजे आंबेगाव बुद्रुक मधील स.न. २६ च्या दक्षिण हद्दी वरील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने एस. पी. इंटरनॅशनल शाळेच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने पणन मंडळ सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस पणन मंडळ सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीने व पुढे दक्षिणेस पणन मंडळ सोसायटीच्या पश्चिमेकडील हद्दीने व पुढेसदर हद्दीच्या सरळ रेषेने श्री हरी हाईट्स सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर हद्दीने व पुढे Atmosphere Apartment च्या उत्तरेकडील रस्त्याने आंबेगाव पठार रस्त्यास (स.न. २९ च्या पश्चिमेकडील) मिळेपर्यंत. तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने कात्रज देहूरोड बायपास रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस कात्रज देहूरोड बायपास रस्त्याने मौजे नऱ्हेच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस नन्हे गावाच्या पूर्वेकडील हद्दीने मौजे आंबेगाव खुर्द वॉर्ड नं. १ च्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस व पुढे दक्षिणेस आंबेगाव खुर्द वॉर्ड क्र. १ च्या पूर्वेकडील हद्दीने मौजे जांभूळवाडी आणि मौजे आंबेगाव खुर्द च्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस मौजे जांभूळवाडी, मौजे भिलारेवाडी, मौजे कोळेवाडी गावाच्या सामाईक हद्दीने मौजे कोळेवाडीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत.
दक्षिण व पश्चिमः मौजे जांभूळवाडी, मौजे भिलारेवाडी. मौजे कोळेवाडी गावाची सामाईक हद्द मौजे कोळेवाडीच्या दक्षिणेकडील हद्दीस जेथे मिळते तेथून पश्चिमेस मौजे कोळेवाडीच्या दक्षिणेकडील हद्दीने मौजे सणसनगरच्या पूर्वेकडील हद्दीस तेथून उत्तरेस मौजे सणसनगरच्या पूर्वेकडील हद्दीने व पुढे मौजे धायरी व मौजे कोळेवाडी यांच्या सामाईक हद्दीने मौजे धायरी मधील जुना वॉर्ड क्र. ४ व ५ च्या पश्चिमेकडील हद्दीने डीएसके विश्वकडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने बारंगणी रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस बारंगणी रस्त्याने व पुढे पश्चिमेस सदर रस्त्याच्या सरळरेषेने (श्रीराम कॉर्नरच्या दक्षिणेकडील पूर्व पश्चिम रस्ता) मौजे धायरी व मौजे किरकीट वाडी यांच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस मौजे धायरी व मौजे किरकीट वाडी यांच्या हद्दीने व पुढे मौजे नांदेड आणि मौजे वडगाव खुर्द यांचे सामाईक हद्दीने मुठा नदीस मिळेपर्यंत.

PMC Ward 34 Narhe Wadgaon Budruk Map
COMMENTS