PMC Ward 24 – Kamla Nehru Hospital – Rasta Peth | प्रभाग क्रमांक २४ – कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ | या प्रभागासाठी एकूण २५० हून अधिक हरकती आल्या आहेत | प्रभागाची रचना आणि व्याप्ती सविस्तर जाणून घ्या 

Homeadministrative

PMC Ward 24 – Kamla Nehru Hospital – Rasta Peth | प्रभाग क्रमांक २४ – कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ | या प्रभागासाठी एकूण २५० हून अधिक हरकती आल्या आहेत | प्रभागाची रचना आणि व्याप्ती सविस्तर जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Sep 06, 2025 8:29 AM

PMC Ward 30 – Karvenagar – Hingane Home Colony | प्रभाग क्रमांक ३० – कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी  | प्रभागाच्या हद्दी आणि व्याप्ती सविस्तर जाणून घेऊयात
PMC Ward 31 – Mayur Colony Kothrud | प्रभाग क्रमांक ३१ – मयूर कॉलनी – कोथरूड  | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 
PMC Ward 27 – Navi Peth Parvati | प्रभाग क्रमांक २७ – नवी पेठ – पर्वती | प्रभागाची व्याप्ती, हद्दी आणि रचना सविस्तर जाणून घ्या!

PMC Ward 24 – Kamla Nehru Hospital – Rasta Peth | प्रभाग क्रमांक २४ – कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ | या प्रभागासाठी एकूण २५० हून अधिक हरकती आल्या आहेत | प्रभागाची रचना आणि व्याप्ती सविस्तर जाणून घ्या

 

Pune Corporation Election 2025 – (The Karbhari News Service) – कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ हा शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभाग. या प्रभागासाठी एकूण २५१ हरकती आणि सूचना आल्या आहेत. प्रभागाची रचना कशी आहे, कुठले परिसर या प्रभागाने व्यापले आहेत, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. (Pune PMC Election 2025)

 

प्रभाग क्रमांक २४ – कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ

लोकसंख्या- एकूण – ७६२३३ -अ. जा. -८०४३ -अ. ज. ६३९

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४

व्याप्ती: रास्ता पेठ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कार्यालय, टिळक आयुर्वेद विद्यालय, इंद्रप्रस्थ सोसायटी, रास्ते वाडा, के. ई. एम. हॉस्पिटल, मंगळवार पेठ, सिंचन भवन, सोमवार पेठ, सदाआनंद नगर, कमला नेहरू हॉस्पिटल, लाल महाल, कसबा पेठ गणपती मंदिर, पवळे चौक, भोई आळी. कुंभारवाडा, पदमजी पार्क, लाल देऊळ परिसर, छत्रपती शिवाजी महाराज आखाडा इ.

उत्तर: अगरवाल रस्ता छ. शिवाजी रस्त्यास जेथून मिळतो तेथून पूर्वेस अगरवाल रस्त्याने नागझरी नाल्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस नागझरी नाल्याने वीर संताजी घोरपडे रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस वीर संताजी घोरपडे रस्त्याने आंबेडकर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिण पूर्वेस आंबेडकर रस्त्याने बाबासाहेब आंबेडकर चौक ओलांडून पी.एम. चौरे पथास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस पी. एम. चौरे पथाने माळी महाराज रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने मुदलीयार रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस मुदलीयार रस्त्याने आंबेडकर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस डॉ. आंबेडकर रस्त्याने पुणे कॅन्टोमेंटच्या हद्दीस मिळेपर्यंत.

पूर्व :  डॉ. आंबेडकर रस्ता (जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पश्चिमे- कडील रस्ता) पुणे कँटोन्मेंटच्या मनपा हद्दीस जेथे मिळतो तेथून दक्षिणेस पुणे कँटोन्मेंटच्या मनपा हद्दीने पदमजी रस्त्यास मिळेपर्यंत.

दक्षिणः पुणे कँटोन्मेंटच्या मनपा हद्द पदमजी रस्त्यास जेथे मिळते तेथून पश्चिमेस पदमजी रस्त्याने क्वार्टर गेट चौकातून येणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत, ( अतुर टेरेसच्या पूर्वेकडील रस्ता ) तेथून उत्तरेस सदर रस्त्याने क्वार्टर गेट चौकात स्वामी बोधराज रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरपश्चिमेस स्वामी बोधराज रस्त्याने कादर भाई चौकात पं. जवाहरलाल रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस पं. जवाहरलाल नेहरू रस्त्याने रघुनाथ धनजी पवार रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने विठ्ठलराव कांगळे रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस विठ्ठलराव कांगळे रस्त्याने लक्ष्मी रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस लक्ष्मी रस्त्याने कै. मोतीलाल बाबूलाल परदेशी रस्त्यास डुल्या मारुती चौकात मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस कै. मोतीलाल बाबूलाल परदेशी रस्त्याने नागझरी नाल्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस नागझरी नाल्याने गणेश रस्त्यास समर्थ चौकात मिळेपर्यंत. (दारूवाला पूल) तेथून पश्चिमेस गणेश रस्त्याने छ. शिवाजी रस्त्यास राजमाता जिजामाता चौकात मिळेपर्यंत.

पश्चिमः छ. शिवाजी रस्ता राजमाता जिजामाता चौकात जेथे मिळतो. तेथून उत्तरेस छ.शिवाजी रस्त्याने अगरवाल रस्त्यास मिळेपर्यंत.

 

The Karbhari - Pune PMC Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: