PMC Ward 2 – Phulenagar – Nagpur Chawl | प्रभाग क्रमांक २ – फुलेनगर- नागपूर चाळ | कशी आहे या प्रभागाची व्याप्ती! जाणून घ्या कुठपर्यंत आहे हद्द!
PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका निवडणुकीने आता वेग घेतला आहे. प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्याने आता इच्छुक लोक कामाला लागले आहेत. मात्र काही प्रभागाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने काही उमेदवार याबाबत आक्षेप घेत आहेत. आज आपण प्रभाग क्रमांक २ कसा आहे, त्याची व्याप्ती किती आहे, लोकसंख्या हे सर्व जाणून घेणार आहोत. (Pune Municipal Corporation – PMC)
प्रभाग क्रमांक २ – फुलेनगर- नागपूर चाळ
लोकसंख्या एकूण ९२६४० – अ. जा. २१००३ – अ. ज. १३५६
निवडून द्यायचे उमेदवार – ४
व्याप्तीः महालक्ष्मी विहार, विश्रांत सोसायटी मधुबन सोसायटी टिंगरे नगर, आदर्श नगर, नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, शांतीनगर, मोहन वाडी प्रतिक नगर इंदिरानगर, फुले नगर, येरवडा मेंटल हॉस्पिटल, राम सोसायटी, हरी गंगा सोसायटी, पंचशिल नगर, माजी सैनिक वसाहत, विश्रांतवाडी पोलीस लाईन, राजीव गांधी वसाहत, कॉमर झोन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, टिंगरे नगर गल्ली नं. १ ते १४ एकता नगर त्रिदल नगर इ.
उत्तर: कळस स्मशानभूमीच्या पश्चिमेकडील हद्द मुळा नदीस जेथे • मिळते तेथून उत्तरपूर्वेस सदर हद्दीने व पुढे कळस स्मशानभूमीकडे येणाऱ्या रस्त्याने जाधव वस्तीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत. (सेंट चावरा केथेलिक चर्चच्या दक्षिणेकडील हद्द) तेथून पूर्वेस सदर हद्दीने मधुबन सोसायटीच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर हद्दीने प्रेमलोक प्लाझा सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर हद्दीने मौजे कळस मधील छ. शिवाजी महाराज रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने व पुढे आळंदी रस्त्याने (संत ज्ञानेश्वर रस्त्याने) मुकुंदराव आंबेडकर चौकात विश्रांतवाडी लोहगाव रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने सिद्धेश्वर नगर सोसायटीच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने एकतानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत पुढे उत्तरेस कुमार समृध्दी सोसायटी आणि नंदन युफोरिया सोसायटीच्या पूर्वेकडील रस्त्याने धानोरी टिंगरेनगर मधील नाल्यास मिळेपर्यंत तेथून उत्तर पूर्वेस सदर नाल्याने टिंगरेनगर गल्ली क्र. १४ ला मिळेपर्यंत.
पुर्वः धानोरी टिंगरेनगर मधील नाला टिंगरेनगर गल्ली क्र. १४ ला जेथे मिळतो तेथून दक्षिणेस टिंगरेनगर गल्ली क्र. १४ ने विश्रांतवाडी लोहगाव रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने विश्रांतवाडी लोहगांव रस्त्याने ५०९ चौकात नॅशनल गेम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस नॅशनल गेम रस्त्याने संजय पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस संजय पार्क मधील रस्त्याने व पुढे पूर्वेस संजय पार्कच्या दक्षिणेकडील हद्दीने संजय पार्क गल्ली क्र. ५ डी रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने संजय पार्क गल्ली क्र. ५ ला मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस गल्ली क्र. ५ ने अमीर चिकन शॉपच्या पूर्वेकडील गल्लीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर गल्लीने विमाननगर पार्किंगच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने नवीन एअरपोर्ट रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस संजय पार्क येथील झोपडपट्टीच्या उ सदर रस्त्याने डंकर्क लाईनच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस व पुढे दक्षिणेस सदर हद्दीने पुणे अहिल्यानगर रस्त्यास रामवाडी चौकाजवळ मिळेपर्यंत.
दक्षिण: पुणे अहिल्यानगर रस्ता रामवाडी चौकात डंकर्क लाईनच्या दक्षिणेकडील हद्दीस जेथे मिळतो तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने डंकर्क लाईनच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस डंकर्क लाईनच्या पश्चिमेकडील हद्दीने महाराष्ट्र विभागीय क्रीडा संकुलच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर हद्दीने गेनबा मोझे रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने दुर्गाभवानी चौकात शांतीरक्षक सोसायटीच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस शांतीरक्षक सोसायटीच्या उत्तरेकडील रस्त्याने नॅशनल गेम रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने येरवडा जेलच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने व पुढे दक्षिणेस येरवडा जेलच्या पश्चिमेकडील रस्त्याने येरवडा प्रेस कॉलनी मधील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने येरवडा जेलच्या पश्चिमेकडील डी. पी. रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर डी. पी. रस्त्याने सम्राट अशोक रस्ता ओलांडून पुढे दक्षिणेस कॉमरझोनच्या पूर्वेकडील डी.पी. रस्त्याने गोल्फ क्लबच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिण पश्चिमेस गोल्फ क्लबच्या हद्दीने लूप रस्त्यास (कै. सदाशिव रामभाऊ निकम रस्त्यास) मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने पुणे आळंदी रस्त्यावरील खडकी कॅन्टोन्मेंटच्या मनपा हद्दीस मिळेपर्यंत.
पश्चिमः लूप रस्ता (कै. सदाशिव रामभाऊ निकम रस्ता ) पुणे आळंदी रस्त्यावरील खडकी कॅन्टोन्मेंटच्या मनपा हद्दीस जेथे मिळतो तेथून उत्तरेस खडकी कॅन्टोन्मेंटच्या मनपा हद्दीने (मुळा नदीने) कळस स्मशानभूमीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत.

COMMENTS