PMC Ward 19 – Kondhwa Khurd Kausarbagh | प्रभाग क्रमांक १९ – कोंढवा खुर्द- कौसरबाग | प्रभागाच्या हद्दी, व्याप्ती, लोकसंख्या आणि रचना सविस्तर जाणून घ्या
Pune PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका निवडणूक प्रभाग रचनेतील कोंढवा खुर्द- कौसरबाग हा १९ क्रमांकाचा प्रभाग. आज या प्रभागाच्या रचने विषयी सविस्तर जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation – PMC)
प्रभाग क्रमांक १९ – कोंढवा खुर्द- कौसरबाग
लोकसंख्या एकूण ८४६१९ – अ. जा. -४९९८ – अ. ज. ४५९
निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४
व्याप्तीः कौसरबाग परिसर, कोंढवा खुर्द, कोणार्क इंद्रायू एन्क्लेव्ह आशीर्वाद पार्क, मिता नगर, भाग्योदय नगर, मिठा नगर, साईबाबा नगर, क्लोअर हायलैंड, क्लोअर हिल्स, कमेला वसाहत, मेफेअर एलेगेन्झा सोसायटी, गुरुनानक नगर, संत गाडगे बाबा मनपा शाळा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट इ.
उत्तर: रायफल रेंजची हद्द शिवनेरी नगर लेन नं.३१ ला जेथे मिळते. तेथून पूर्वेस शिवनेरी नगर लेन क्र. ३१ ने लेन क्र. ३० ला मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर लेन ने तेथून पूर्वेस सदर हद्दीने शिवनेरी नगर लेन नं. २९ २८ २७ ओलांडून (अनन्य हाईट्सची दक्षिणेकडील हद्द व साई आंगणची उत्तरेकडील हद्द ) व पुढे शिवगंगा हाईट्सच्या च्या दक्षिणेकडील हद्दीने पुढे पूर्वेस ब्रम्हा अव्हेन्यू सोसायटीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर हद्दीने व पुढे पूर्वेस ब्रम्हा अव्हेन्यू सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीने शत्रुंजय प्लाझा इमारतीच्या पूर्वेकडील हद्दीस • मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर हद्दीने व सदर हद्दीच्या सरळ रेषेने (शत्रुंजय प्लाझा सोसायटीच्या पूर्वेकडील रस्ता) शत्रुंजय प्लाझा सोसायटीच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने ब्रम्हा इस्टेट सोसायटीच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने कोंढवा रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस कोंढवा रस्त्याने साळुंखे विहार रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस साळुंखे विहार रस्त्याने कार ओ केअर सर्व्हिस सेंटरच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने व पुढे भैरोबा नाल्याने NIBM रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस NIBM रस्त्याने नारायण आण्णाजी शिंदे रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून उत्तरेस सनश्री सुवर्णयुग इमारतीच्या आणि सनसिटी बी इमारतीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर हद्दीने व पुढे पूर्वेस सिद्धार्थ नगरच्या व ग्रॅफिकोन पॅरेडाइज च्या दक्षिणेकडील हद्दीने व पुढे सदर हद्दीच्या सरळ रेषेने मौजे महंमदवाडी व मौजे कोंढवा खुर्द यांचे हद्दीस मिळेपर्यंत.
पुर्व व दक्षिण : ग्रॅफिकोन पॅरेडाइज च्या दक्षिणेकडील हद्दीची सरळ रेषा मौजे महंमदवाडी व मौजे कोंढवा खुर्द यांचे हद्दीस जेथे मिळते तेथून दक्षिणेस सदर हद्दीने एन. आय.बी.एम. कडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून उत्तरेस एनआयबीएम रस्त्याने मौजे कोंढवा बु. व कोंढवा खु. यांचे हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर हद्दीने भैरोबा नाल्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस भैरोबा नाल्याने चांद मस्जिद आणि कासा लिव्हिंग लोटस इमारतीच्या उत्तरेकडील गल्लीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर गल्लीने आश्रफ नगर लेन नं. ८ ला मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर लेन क्र ८ ने गौसुल्वरा मस्जिदच्या उत्तरेकडील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस आश्रफ नगर रस्त्यास मिळेपर्यंत (अलिफ टॉवर इमारतीच्या पश्चिमेकडील) तेथून उत्तरेस सदर रस्त्याने मौजे कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक यांच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर हद्दीने युनिटी पार्क सोसायटी मधील सीमाभिंत ओलांडून उत्तर दक्षिण रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने सारा रेसिडेन्सी इमारतीच्या उत्तर हद्दीच्या रेषेस मिळेपर्यंत. तेथून पश्चिमेस सदर हद्दीच्या सरळ रेषेने व पुढे संत ज्ञानेश्वर नगर लेन नं. १ ने कुमार पृथ्वी फेज २ च्या पूर्वेकडील हद्दीपर्यंत, तेथून उत्तरेस सदर हद्दीने पश्चिमेस कुमार पृथ्वी फेज २ च्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने व पुढे सदर रस्त्याच्या सरळ रेषेने गंगाधाम शत्रुंजय मंदिर रस्त्यास मिळेपर्यंत.
पश्चिम: कुमार पृथ्वी फेज २ ची उत्तरेकडील रस्त्याची सरळ रेषा गंगाधाम- शत्रुंजय मंदिर रस्त्यास जेथे मिळते तेथून उत्तरेस गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्याने आशापुरा माता मंदिराच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने व पुढे रस्त्याच्या सरळ रेषेने रायफल रेंजच्या पूर्व हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस रायफल रेंजच्या हद्दीने शिवनेरी नगर लेन नं.३१ ला मिळेपर्यंत.

COMMENTS