PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला सुप्रिया सुळेंचे समर्थन

HomeBreaking Newsपुणे

PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला सुप्रिया सुळेंचे समर्थन

Ganesh Kumar Mule Jun 18, 2023 4:30 PM

Vedanta Foxconn project | महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला  |खासदार सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन
Rupali Patil : पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय!  : रुपाली पाटील यांचे सूचक ट्विट 
NCP Pune Resigns news |  Finally all office bearers of NCP in Pune resigned

PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला सुप्रिया सुळेंचे समर्थन 

| आंदोलनकर्त्यांची भेट घेत दिला दिलासा 

PMC Teachers Agitation Update  | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात (PMC Education Department) काम करणाऱ्या रजा मुदतीतील ९3 शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी २०१७ (एप्रिल) पासून लागू करावी. या मागणीसाठी सर्व शिक्षण सेवक गेल्या तीन दिवसापासून महापालिका भवनासमोर आमरण उपोषणास (Agitation) बसले आहेत.  त्यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने देखील समर्थन दिले आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे आणि माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी रविवारी रात्री या आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. (PMC Teachers Agitation update)

खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाकर्त्याची भेट घेत त्यांचा प्रश्न समजून घेतला. तसेच आंदोलनकर्त्यांना साखळी पद्धतीने आंदोलन करण्याची सूचना केली. तसेच महापालिका प्रशासनाने सवेंदनशील पणे प्रश्न हाताळण्याची मागणी केली. याआधी देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न सोडवण्याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. त्यानंतर आज देखील चर्चा केली. त्यामुळे हा प्रश्न लवकर सुटेल, असे मानले जात आहे. (PMC Education Department)

दरम्यान या आंदोलनाला उर्दू शिक्षक संघटनेने देखील पाठिंबा दिला आहे.

शिक्षण सेवकांना कायम करण्याबाबतचा आदेश २४ फेब्रुवारीस महापालिका प्रशासनास प्राप्त झाला. मात्र आज  ४ महिने होऊनही उच्चन्यायालयाच्या आदेशास केराची टोपली दाखवून प्रशासन आम्हास झुलवत आहे. असा आरोप आंदोलनकर्त्या शिक्षण सेवकांनी केला असून ते गेल्या तीन दिवसापासून आंदोलास बसले आहेत.  सन 2009 पासून ९3 रजा मुदत शिक्षक इमाने इतबारे केवळ ६०००/- रू च्या एकवट मानधनावर काम करीत आहेत. विदयेच्या माहेरघरात आज शिक्षकांची अतिशय दयनीय अवस्था आहे. प्रशासनासला केव्हा  जाग येणार? असा प्रश्न देखील या आंदोलनकर्त्यांनी विचारला आहे. (Pune Municipal Corporation)

कमी पगारातही आमच्या सर्व शिक्षकांनी कामात कोणतीही दिरंगाई केली नाही. शिष्यवृत्ती परिक्षा, मंथन, NMMS परिक्षेत आमची मुले घवघवीत यश प्राप्त करीत आहेत. ज्ञानदान करणा-या शिक्षकास अशा प्रकारची वागणूक देणा-या आमच्याच प्रशासनास आम्ही काय म्हणावे? एका रात्रीतून २१९ एकतर्फी शिक्षक भरले जातात. तर दुसरीकडे आपले शिक्षक वाऱ्यावर सोडून द्यायचे आणि दुसऱ्यांना आत घ्यायचे.  हा कोणता प्रशासनाचा न्याय? असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी केला आहे. (PMC Pune Education Department)

 उच्च न्यायालयाने 24फेब्रुवारी,2023 दिलेल्या आदेशानुसार तात्काळ कार्यवाही करावी.अशीआमची मागणी आहे. जोपर्यंत कार्यवाही करण्यात येत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण असंच चालू राहील. असं आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. (PMC Pune News)

——-

News Title |  PMC Teachers Agitation Update |  Supriya Sule’s support for the hunger strike of education workers during the leave period |  Met the agitators and gave relief