PMC Standing Committee | साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई रस्ता येथे 75 कोटींचा उड्डाणपूल | महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर 

Homeadministrative

PMC Standing Committee | साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई रस्ता येथे 75 कोटींचा उड्डाणपूल | महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर 

Ganesh Kumar Mule Jul 16, 2026 7:51 AM

National Commission for Scavengers | हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्या | डॉ. पी. पी. वावा
Madhuri Misal on GBS | गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराबाबत वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काय दिले निर्देश!
Naval Kishore Ram IAS | जास्तीत जास्त चेंबर्स सम पातळीवर आणण्याची कार्यवाही अधिक गतीने करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या  सूचना

PMC Standing Committee | साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई रस्ता येथे 75 कोटींचा उड्डाणपूल | महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे पेठ शिवाजीनगर येथील साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 75 कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल/ग्रेड सेपरेटर बांधण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. या कामासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम 72(ब) प्रमाणे दायित्व पत्करण्याची मान्यता स्थायी समिती व मुख्य सभेकडून मागितली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

वाकडेवाडी अंडरपास अपुरा, कोंडी नित्याची
सध्या पुणे पेठ शिवाजीनगर ते जुना पुणे-मुंबई रस्त्याला जाण्यासाठी वाकडेवाडी अंडरपास उपलब्ध आहे. मात्र त्याची क्षमता कमी असल्याने दररोज सकाळी व संध्याकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडवण्यासाठी नागरिक, स्थानिक प्रतिनिधी आणि आमदार यांनी उड्डाणपूल/ग्रेड सेपरेटर बांधण्याची मागणी केली होती.

त्याअनुषंगाने मुख्य अभियंता प्रकल्प कार्यालयामार्फत या कामाचे नियोजन करण्यात आले.

तांत्रिक छाननी समितीने 73,41,69,250/- रुपयांचे पूर्वगणनपत्रक मंजूर केले आहे. महापालिका आयुक्तांनीही प्रशासकीय मान्यता दिली आहे.

दोन वर्षात निधीची तरतूद
कामासाठी सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात निधी उपलब्ध नसल्याने 2025-26 मध्ये 2.60 कोटींची तरतूद वर्गीकरण मार्फत आली होती. त्याला स्थायी समिती आणि मुख्य सभेने मान्यता दिली आहे. उर्वरित निधी सन 2026-27 व 2027-28 या आर्थिक वर्षात टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याची मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे. पावसाळा सोडून दीड वर्षात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर तो मुख्य सभेत अंतिम निर्णयासाठी जाईल. मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात होणार आहे.

या उड्डाणपुलामुळे शिवाजीनगर, पुणे पेठ परिसरातील नागरिकांना तसेच जुना पुणे-मुंबई महामार्गावर जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: