PMC Standing Committee | 60 संगणक ऑपरेटरना दिलासा | एकवट वेतनावर सेवेत घेण्याचा ठराव स्थायी समितीत मंजूर 

Homeadministrative

PMC Standing Committee | 60 संगणक ऑपरेटरना दिलासा | एकवट वेतनावर सेवेत घेण्याचा ठराव स्थायी समितीत मंजूर 

Ganesh Kumar Mule Sep 05, 2026 8:35 PM

Mahametro | महामेट्रोकडून जिल्ह्यातील सर्वंकष वाहतूक आराखडा सादर | लोकप्रतिनिधींनी आराखड्याचा अभ्यास करुन सूचना कळवाव्यात- उपमुख्यमंत्री अजित पवार
PMC on Stray Dogs | भटक्या श्वानांना ‘मायक्रोचिप’ बसवण्याचा पुणे महापालिकेचा  निर्णय!  |  असा निर्णय घेणारी राज्यातील पहिली महापालिका! 
 PMC Road Departmetn | प्रकल्पांची नावे बदलून त्याच रस्त्यांची वारंवार दुरुस्ती कशासाठी? |  रस्त्याच्या कामाबद्दलची श्वेतपत्रिका काढण्याची माजी नगरसेवकांची पथ विभाग प्रमुखांकडे मागणी

PMC Standing Committee | 60 संगणक ऑपरेटरना दिलासा | एकवट वेतनावर सेवेत घेण्याचा ठराव स्थायी समितीत मंजूर

| सदस्य विशाल धनवडे यांचा प्रस्ताव

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये गेल्या दोन दशकांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या 60 संगणक ऑपरेटरना महापालिकेच्या सेवेत एकवट वेतनावर समाविष्ट करून घेण्याचा ठराव स्थायी समितीमध्ये मंजूर झाला आहे. स्थायी समिती सदस्य विशाल धनवडे यांनी हा प्रस्ताव मांडला होता. (PMC Computer operator)

काय आहे प्रस्तावात?

पुणे महापालिकेत सन 2005 पासून ‘स्मार्ट सेवा सहकारी संस्था’ मार्फत संगणक ऑपरेटर कार्यरत होते. 2012 पासून त्यांना 5-6 महिन्यांच्या मुदतीवर तर 2016 मध्ये सभागृह नेत्याच्या ठरावानुसार 6 महिने एकवट वेतनावर घेण्यात आले होते.

2017 मध्ये प्रशासकीय बदलानंतर संस्था बंद पडल्याने या ऑपरेटरना कामावरून कमी करण्यात आले होते. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या शिफारशीवरून आणि तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानुसार 60 जणांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत घेण्यात आले.

2018 पासून माहिती तंत्रज्ञान विभागाच्या निविदा प्रक्रियेद्वारे हे 60 ऑपरेटर अत्यंत प्रामाणिकपणे आणि दक्षतेने विविध खात्यांमध्ये सेवा देत आहेत. यातील अनेकांना 10 ते 15 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून वयोमर्यादा ओलांडल्याने ते इतर शासकीय नोकऱ्यांसाठी पात्र राहिलेले नाहीत.

त्यामुळे त्यांची प्रदीर्घ सेवा आणि बहुमूल्य योगदान विचारात घेऊन त्यांना मनपा सेवेत एकवट वेतनावर सामावून घेताना वयोमर्यादेची अट विशेष बाब म्हणून शिथिल करावी, अशी मागणी सदस्य विशाल धनवडे यांनी ठरावाद्वारे केली होती.

स्थायी समितीने हा ठराव मंजूर केल्याने आता याबाबतचा अभिप्राय आणि अंतिम कार्यवाहीसाठी हा विषय  महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर 60 संगणक ऑपरेटर थेट महापालिकेच्या माध्यमातून एकवट वेतनावर सेवेत कायम होणार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar
    एस व्ही कांबळे 3 weeks ago

    पुणे महानगरपालिकेतील सर्वच कंञाटी कामगारांना मेहरबाननजर व्हावी आणि कायम कामगाराप्रमाणे संरक्षण मिळावे,कामाच्या ठिकाणी कायम रोजगार ईएसआय आणि पगारी रजा मिळाव्यात…

DISQUS: 0