PMC Standing Committee | प्राथमिक शिक्षण विभागाकडील कंत्राटी शिक्षकांना मुदतवाढ | स्थायी समितीचा निर्णय

Homeadministrative

PMC Standing Committee | प्राथमिक शिक्षण विभागाकडील कंत्राटी शिक्षकांना मुदतवाढ | स्थायी समितीचा निर्णय

Ganesh Kumar Mule Mar 17, 2026 8:23 PM

PMC Primary Education Department | शारीरिक शिक्षण संघटक तथा क्रीडा अधिकारी पदाच्या जागा पदोन्नती ने भरल्या जाणार!
RTE Admission | आरटीई अंतर्गत राखीव जागांसाठी अर्ज करण्याचे पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे आवाहन!
PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणार ओळखपत्र!

PMC Standing Committee | प्राथमिक शिक्षण विभागाकडील कंत्राटी शिक्षकांना मुदतवाढ | स्थायी समितीचा निर्णय

 

PMC Primary Education Department – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील कंत्राटी शिक्षकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेत सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी करार पद्धतीने भरती करण्यात आली होती. निवडयादीतील १८८ उमेदवारांपैकी १४५ उमेदवारांनी कागदोपत्रांची पडताळणी केली. त्यापैकी १०६ उमेदवार प्रत्यक्ष कामावर रूजू झाले होते. त्यांच्याशी करार करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात रूजू झालेल्या शिक्षकांची मुदत १६ मार्च २०२६ रोजी संपुष्टात आली. तर प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या टप्प्यातील ६२ शिक्षकांची मुदत ३० एप्रिल २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे. (Shrinath Bhimale PMC)

या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील १०६ शिक्षकांची मुदत १६ मार्च रोजी संपुष्टात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता या शिक्षकांना १८ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला होता. त्याला स्थायी समितीने मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

तसेच महापालिकेच्या विशेष मुलांसाठीच्या शाळेमधील (शाळा क्रमांक १४) तीन शिक्षकांची एकवट मानधनावर करार पद्धतीने सहा महिन्यांसाठी भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: