PMC Standing Committee Chairman Election | येत्या सोमवारी (ता. २३) स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक | १८ तारखेला अर्ज स्वीकारले जाणार 

Homeadministrative

PMC Standing Committee Chairman Election | येत्या सोमवारी (ता. २३) स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक | १८ तारखेला अर्ज स्वीकारले जाणार 

Ganesh Kumar Mule Feb 16, 2026 7:05 PM

Pune PMC News | सामान्य प्रशासन विभागात अधिकृत कायम स्वरूपी प्रशासन अधिकारी नेमण्याची मागणी
Katraj-kondhva Road | कात्रज-कोंढवा रोड बाबतचा आयुक्तांचा दावा ठरला फोल!
Pune DCC Bank | विद्यार्थ्यांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा मोठा निर्णय

PMC Standing Committee Chairman Election | येत्या सोमवारी (ता. २३) स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक | १८ तारखेला अर्ज स्वीकारले जाणार

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत स्थायी समिती सह ७ विषय समित्या अस्तिवात आल्या आहेत. या सर्व समित्यांवर सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. आता या समित्यांसाठी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बाकी आहे. ही प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे. सुरुवातीला स्थायी समिती चा अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यानुसार सोमवार २३ फेब्रुवारी ला सकाळी ११:३० वाजता ही निवड प्रक्रिया पार पडेल. अशी माहिती नगरसचिव योगिता भोसले यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

नगरसचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला स्थायी समितीचा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यानंतर बाकी समित्यांचे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रीयासाठी विभागीय आयुक्त यांना पत्र देण्यात आले होते. या निवडीसाठी विभागीय आयुक्त यांना तारीख, वेळ आणि पीठासीन अधिकारी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त यांनी सोमवार २३ फेब्रुवारी ला सकाळी ११:३० वाजता निवणूक घेण्याची वेळ दिली आहे. त्यानुसार निवडणूक पार पडणार आहे. स्थायी समितीच्या विशेष सभेत ही प्रक्रिया होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके (Satishkumar Khadke IAS)  हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित असणार आहेत.

दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी इच्छुक नगरसेवकांचे अर्ज हे १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. असे नगरसचिव यांनी सांगितले.

दरम्यान समितीचा अध्यक्ष हा भाजपचा नगरसेवक असणार आहे.  स्थायी समिती सदस्य पदासाठी पक्षीय बलाबल नुसार भाजप कडून १२ सदस्य देण्यात आले आहेत. यामध्ये रुपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भुमकर, विशाल धनवडे, रत्नमाला सातव, प्राची आल्हाट, श्रीनाथ भिमाले, मयूरी कोकाटे, डॉ कोद्रे दादा, वृषाली कामठे, निशा मानवतकर आणि संदीप बेलदरे यांची नियुक्ती केली आहे. यातील कुणी एक स्थायी समितीचा अध्यक्ष होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: