PMC Standing Committee Chairman | या पंचवार्षिक मध्ये सर्वच स्थायी समिती अध्यक्षांना बजेट सादर करून त्यावर अंमल करण्याची संधी!

Homeadministrative

PMC Standing Committee Chairman | या पंचवार्षिक मध्ये सर्वच स्थायी समिती अध्यक्षांना बजेट सादर करून त्यावर अंमल करण्याची संधी!

Ganesh Kumar Mule Jan 31, 2026 3:15 PM

MLA Siddharth Shirole | जीबीएस रुग्णांसाठी अनुदानात वाढ मिळावी | आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मागणीवर आरोग्य मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
Indrayani River Devlopment Project | PMRDA | पीएमआरडीएचा इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर!
Pune Airport | पुणे विमानतळाला ‘स्लॉट वाढीचा’ बूस्टर | हवाई वाहतुकीत वाढीसाठी मोकळा मार्ग

PMC Standing Committee Chairman | या पंचवार्षिक मध्ये सर्वच स्थायी समिती अध्यक्षांना बजेट सादर करून त्यावर अंमल करण्याची संधी!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणूक नुकतीच पार पडली आहे. ९ फेब्रुवारीला सभागृह अस्तित्वात येणार आहे. त्यानंतर स्थायी समिती अस्तित्वात येईल. समितीतील सदस्य अध्यक्ष ठरवतील. दरम्यान या पंचवार्षिक मध्ये सर्वच म्हणजेच 5 ही अध्यक्षांना बजेट मांडण्याची संधी मिळून त्यावर अंमल करण्याची संधी देखील मिळणार आहे. (PMC Budget)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ९५ नुसार महानगरपालिकेचे महसूली, भांडवली इ. उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आराखडा (“अ” व “क’) अंदाजपत्रक महापालिका आयुक्तानी १५ जानेवारी अगर तत्पूर्वी स्थायी समितीस सादर करणे आवश्यक आहे. त्यांनतर स्थायी समिती अध्यक्ष त्यात बदल करून बजेट मुख्य सभेला सादर करतात. मुख्य सभेत चर्चा होऊन हे बजेट ३१ मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्यक असते. त्यांनतर त्यावर अंमल करता येतो.

मागील पंचवार्षिक मध्ये पहिल्या स्थायी समिती अध्यक्षाला २ बजेट मांडण्याची संधी मिळायची. तर पाचव्या वर्षात अध्यक्षाला बजेट मांडता येत नसायचे. प्रशासनाकडून हे बजेट सादर केले जात असे. यावेळेस मात्र यात बदल होणार आहे. कारण यंदा फेब्रुवारी मध्ये सभागृह आणि स्थायी समिती अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे बजेट सादर करण्यासाठी वेळ आहे.

दरम्यान आपण सादर केलेल्या बजेट वर संबंधित अध्यक्षाला अंमल करण्यास मिळत असल्याने आता विकासकामे चांगल्या पद्धतीने मार्गी लावण्यास वाव आहे. कारण हे अध्यक्ष विविध कल्पना राबवून योजना सुचवत असतात. प्रशासनाशी पाठपुरावा करून या योजना मार्गी लावण्याचे काम अध्यक्ष करू शकतात. विशेष म्हणजे पाचही अध्यक्ष बजेट सादर करून त्यावर अंमल करू शकणार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: