PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणार ओळखपत्र!

Homeadministrative

PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणार ओळखपत्र!

Ganesh Kumar Mule Aug 29, 2024 9:53 AM

PMC Primary Education Department | शिक्षण मंडळाच्या समायोजनाचा मार्ग मोकळा! | शिक्षण विभागाची सेवाज्येष्ठता यादी मनपा सेवाज्येष्ठता यादीत समावेशन करण्याचे आदेश
Appeal of Pune Municipal Primary Education Department to apply for reserved seats under RTE!
8 crores proposed for PMC Futuristic schools and 31.50 crores provision for DBT scheme!

PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणार ओळखपत्र!

| विद्यार्थी हरवत असल्याचे प्रकार पाहून महापालिका प्रशासनाचा निर्णय

 

PMC Primary Education Department- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation-PMC) वतीने मतिमंद प्रवर्गातील मुलांसाठी विशेष शाळा (PMC Special Children School) चालवली जाते. मात्र महापालिका आपल्या कुठल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र देत नाही. दरम्यान नुकतेच विशेष मुले हरवत असल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्याची मागणी शाळेने केली होती. त्यामुळे ओळखपत्र देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच स्वतंत्र सुरक्षारक्षक देण्याची मागणी देखील शाळेने केली आहे. याबाबत सुरक्षा विभाग देखील सकारात्मक आहे. (Pune PMC News)

प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगपालिका संचालित विशेष मुलांची शाळा (मतिमंद प्रवर्ग), मनपाशाळा क्र.१४ बी, शिवाजीनगर गावठाण, पुणे-०५ येथे सुरु असून या शाळेत पुणे शहराच्या विविध भागातून व सामान्य कुटुंबातून विशेष विद्यार्थी येत असतात. यामध्ये ऑटीस्टिक, सेरेबल पाल्सी, अतिचंचल, मतिमंद, स्लोलर्नर, डाऊन सिंड्रोम या विविध प्रकारातील विद्यार्थी येत असतात. सध्या शाळेचा पट ३२ असून साधारण २५ ते ३० विद्यार्थी शाळेत नियमित उपस्थित असतात. (PMC Schools)

काही विद्यार्थी एका जागेवर स्थिर बसत नाहीत, वर्गातून बाहेर पळणे, वर्गातील वस्तू फेकणे, इतरांना मारहाण करणे अशा समस्या या विद्यार्थ्यामध्ये असतात. तसेच सेरेबल पाल्सी विद्यार्थ्यांना हातापायाच्या हालचालीमध्ये मर्यादा असतात, अशा विद्यार्थ्यांना व्हील चेअर किव्हा रिक्षातून उचलून आणावे लागते. सध्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील विशेष शाळेसाठी सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे. असे शाळेकडून प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे.

तसेच नुकतेच विद्यार्थी हरवत असल्याची घटना देखील समोर आली. यात पालकांना बराच मानसिक त्रास सहन करावा लागतो. जर संबंधित विद्यार्थ्यांकडे ओळखपत्र असते तर त्यांना संबंधित शाळेत किंवा घरी पोचवणे सोपे झाले असते. त्यामुळे शाळेने ओळखपत्र देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0