Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर सुध्दा गुन्हे दाखल करा | अरविंद शिंदे

Pune Congress- Shivsena UBT Agitaion

HomeBreaking News

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर सुध्दा गुन्हे दाखल करा | अरविंद शिंदे

Ganesh Kumar Mule Aug 28, 2024 10:09 PM

Pune Congress Agitation | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधीत  चिखलफेको आंदोलन 
Ghanshyam Nimhan | Pune congress | पुणे काँग्रेसच्या चिटणीसपदी घनश्याम निम्हण
OBC Reservation | ओबीसींना राजकीय आरक्षण लागू झाल्याबाबत पुण्यातील राजकीय पक्षांना काय वाटते?

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर सुध्दा गुन्हे दाखल करा | अरविंद शिंदे

 

Pune Congress – Shivsena Agitation – (The Karbhari News Service) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड येथे महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे नेतेमंडळी ही सहभागी झाले होते. (Pune News)

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हाणाले की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी घटना असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार हे कमीशनखोर आहे, हे सरकार सिमेंट, वाळू, विटा, लोखंड यातही कमीशन खाते, त्यांना कशाचीच लाज वाटत नाही. शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्याचे काम ठाण्यातील नवखा, अनुभव नसलेला शिल्पकार आपटे याला दिले. या कामावर २.३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर ५ कोटी रुपये सौंदर्यीकरणावर खर्च करण्यात आले. वास्तविक पाहता छत्रपतींचा पुतळा उभारणीचे काम तज्ञ व अनुभवी व्यक्तीला दिले पाहिजे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसदेचे उद्घाटन केले त्या वास्तूला गळती लागली, अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले मंदिराला गळती लागली, समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले, त्याला भेगा पडल्या, हा नरेंद्र मोदींचा हातगुण म्हणायचे की काय असा प्रश्न आम्हाला पडतो. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे निकृष्ट बांधकाम करून भाजपा सरकारने महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवली आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही. शिवप्रेमी म्हणून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.’’

यानंतर नगरसेवक चंदूशेठ कदम, शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार, संजय मोरे, गजानन थरकुडे, आम आदमी पक्षाचे अभिजीत मोरे, ब्लॉक अध्यक्ष रवींद्र माझीरे यांचीही भाषणे झाली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड अभय छाजेड, कमल व्‍यवहारे, संगीता तिवारी, मनीषा आनंद, अजित दरेकर, मुख्तार शेख, गोपाळ तिवारी, शिवा मंत्री, राजेंद्र भुतडा, रविंद्र माझीरे, राजू ठोंबरे, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, विशाल जाधव, विश्वास दिघे, उमेश कंधारे, संदिप मोकाटे, द. स. पोळेकर, हर्षद हांडे, शिवाजी भोईटे, हनुमंत पवार, यशराज पारखी, विवियन केदारी, प्रकाश पवार, शाम काळे, नयनाताई सोनार, शोभाना पन्नीकर, बेबी राऊत, सुनिता नेमुर, रमा भोसले, कांता ढोणे, सुंदर ओव्‍हाळ, शारदा वीर, उषा राजगुरू, कान्हुभाऊ सांळुके, शिवाजी सोनार, पांडुरंग गायकवाड, सोमनाथ पवार, स्वाती पवार, सुरेश तनपुरे, गणेश मारणे, गणेश जाधव, शिवसेना प्रमुख संदिप मोरे, गजानन थरकुडे, उमेश ठाकुर, महेश विचारे, युवराज मदगे, राज जाधव, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, उमेश कंधारे, अमोल काळे, प्राची दुधाणे, मनीषा करपे, वंदना पोळ, इंदूबाई हुलावळे, बाबा जाधव आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
——–

युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन

पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज संध्याकाळी डेक्कन गुड लक चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुध अभिषेक घालून या सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आले.

या मोदी सरकार व शिंदे फडणवीस सरकार कडून सतत छत्रपती घराण्याचा अवमान करण्यात येत आहे, हेच वारंवार घडत राहिल्यास या सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही असा इशारा पुणे शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. सौरभ अमराळे यांनी दिला.

या आंदोलन दरम्यान पुणे शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. सौरभ अमराळे, प्रदेश पदाधिकारी प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, आनंद दुबे, विक्रम धर्मावत, गणेश उबाळे, वाहिद निलगिर, आशिष व्यवहारे, विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश वीरकर, अजित ढोकळे आशुतोष जाधवराव, शहर पदाधिकारी विवेन केदारी, सद्दाम शेख, कुणाल काळे, ऋतिक शिंदे पुणमित तिवारी, सुजित गोसावी,प्रणव खरात, ऍड. सुरज मादेवाड जमादार, ऋषी सणस यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0