PMC Solid Waste Management Special Scod Vehicle | स्पेशल स्कॉड व्हेईकल चा दुहेरी फायदा : कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढलं.. कर्मचारी गांधीगिरी करू लागले… आणि लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली
| चांगला प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचा केला जातो सन्मान
PMC Solid Waste Management Special Scod Vehicle | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) हद्दी मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली (PMC Solid Waste Management Bylaws) लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विविध कारवाई करणेकरिता भरारी पथकाच्या दळणवळण साठी व दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 4 स्पेशल स्कॉड व्हेईकल (Special Scod vehicle) ची खरेदी करण्यात आली आहे. त्याचे वितरण क्षेत्रीय कार्यालयांना महापालिका आयुक्तांच्या (Pune Municipal Corporation commissioner) हस्ते करण्यात आले. या गाड्यांचा महापालिकेला दुहेरी फायदा होताना दिसतोय. कारण यामुळे घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. यामुळे दंडात्मक कारवाईला बळ मिळाले आहे. तर कचरा आणि प्लास्टिक निर्मूलन बाबत नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. त्यामुळे शहर स्वच्छ राहण्यास देखील मदत होत आहे. या कारणाने सर्वच क्षेत्रीय कार्यालय या गाड्यांची मागणी करत आहेत.
आगामी काळात अजून 14 गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. दरम्यान या नुकत्याच घेतलेल्या 4 गाड्या दंडात्मक कारवाई प्रभावीपणे करणाऱ्या ४ क्षेत्रीय कार्यालय म्हणजे हडपसर-मुंडवा क्षेत्रीय कार्यालय (PMC Hadapsar Mundhva Ward office), कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय (PMC Kothrud Bavdhan Ward office), नगररोड- वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय (PMC Nagarrod Vadgaonsheri Ward office) आणि प्लास्टिक स्कॉड मुख्य मनपा भवन (Plastic Scod PMC bhavan) कार्यालय यांना देण्यात आल्या आहेत.
पुणे शहरात दैनंदिन कचरा निर्मिती (PMC Garbage Collection) २२०० ते २३०० मे. टन पर्यंत होत आहे. दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणेकरिता केंद्र ल शासनामार्फत घनकचरा हाताळणी नियमावली २०१६ (PMC Solid Waste Management Bylaws 2026) निर्गमित केले आहे. नियमावली नुसार घनकचरा व्यवस्थापन निगडीत विविध नियमांचे पालन करणेकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वेळोवेळी कारवाई करणे अनिवार्य आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक बॅन, क्रॉनिक स्पॉट, अॅटी स्पिटिंग, ओपन डम्पिंग, वेस्ट बर्निंग इ स्वरूपाच्या विविध कारवाईचा समावेश आहे. तसेच नव्याने समाविष्ठ ३४ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ ची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. (Pune PMC News)
विविध कारवाई करणेकरिता दैनंदिन स्थळ पाहणी करणे आवश्यक आहे. या करिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दळणवळण करिता पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. सद्यस्थितीत सेवकांना त्यांचेकडील दुचाकी वाहनावर जाऊन कारवाई करावी लागते. जेणेकरून कारवाई प्रभावी रित्या होत नाही. तसेच मुख्य खात्याकडे देखील मोठ्या कारवाया करणेकरिता वाहन उपलब्ध होत नाही. सेवकांना कारवाई करिता वाहने उपलब्ध करून दिल्यास त्यांचे मनोबल वाढून कारवाई प्रभावी रित्या होणेस मदत होईल व त्याचे दुरोगामी चांगले परिणाम होतील. त्यामुळे गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. त्याचा फायदा होताना दिसतो आहे.
एका गाडीत चार ते पाच लोक असतात. संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील विभागीय निरीक्षक यांना या गाडीचे टीम लीडर बनवण्यात आले आहे. यासाठी दोन शिफ्ट करण्यात आल्या आहेत. पहिली शिफ्ट ही सकाळी 6:30 ते 2:30 आणि दुसरी शिफ्ट ही 2:30 ते 10:30 अशी आहे. त्यानुसार महापालिकेचे कर्मचारी गर्दी किंवा मार्केट च्या ठिकाणी आपली गाडी लावतात आणि जनजागृती पर संदेश देतात. यामुळे व्यावसायिक लोकांवर चांगला वचक बसला आहे. शिवाय नागरिक देखील नियमांचे पालन करतात दिसतात. या सकारात्मक परिणामाने घनकचरा विभागाच्या या संकल्पनेचे कौतुक होत आहे.
—-
आमच्या मालकीच्या गाड्या आल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढलं आहे. विशेष म्हणजे नागरिक देखील सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे जनजागृती चांगल्या पद्धतीने होत आहे. काही ठिकाणी आमचे कर्मचारी गांधीगिरी करत आहेत. त्याचाही सकारात्मक परिणाम पाहायला मिळतोय. या संकल्पनेला अजून बळ दिले जाईल.
– संदीप कदम, उपायुक्त
—-
प्रशासनाने आम्हांला दंडात्मक कारवाई करण्यासाठी चारचाकी बोलेरोगाडी देऊन आम्हांला सन्मानित करून कौतुकाची थाप देऊन पुणे शहरअधिकाअधिक स्वच्छ ठेवण्यासाठी गाड्या सुपूर्द करून आमचे खरोखरच मनोबल वाढवलेले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये काम करत असताना आम्हाला असंख्य अडचणींना सामोर जावे लागते. मात्र या गाड्या आल्याने आमचे काम सोपे झाले आहे. पोलिस अधिकारी कारवाईसाठी आलेत की काय असा नागरिकांमध्ये आमचा दरारा वाढत आहे. चांगला प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचा आम्ही गुलाब पुष्प देऊन सन्मान देखील करतोय. कचरा आणि घाणीमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचे आरोग्यदायी मनोबल वाढवलेले असून येणाऱ्या कालावधीमध्ये स्वच्छ स्पर्धेत पुणे शहराचा पहिला नंबर असेल यात किंचितही शंका वाटत नाही.
– संजय धनवट, DSI, हडपसर क्षेत्रीय कार्यालय
—-
गाड्या आल्याने आमची काम करण्याची गती वाढली आहे. याला कारण म्हणजे आमचे मनोधैर्य उंचावण्याचे काम प्रशासनाने केले आहे. दंडात्मक कारवाई करण्यास बळ मिळाले आहे. शिवाय नागरिकांमध्ये आमचा सकारात्मक दबाव वाढला आहे. त्यामुळे कचरा रस्त्यावर फेकण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. तसेच प्लास्टिक साठवण आणि विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर देखील आळा बसू लागला आहे. गाड्या नसताना तेवढी प्रभावीपणे कारवाई होत नव्हती. शिवाय गाडी असल्याने आम्ही जनजागृती देखील खूप चांगल्या पद्धतीने करत आहोत.
– राम सोनावणे, DSI, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय.
—
प्रशासनाने आम्हांला गाड्या दिल्याने आमचे कर्मचारी अगदी मनापासून काम करत आहेत. गाड्या देण्याचा मूळ हेतू हा शहर स्वच्छ ठेवणे हा आहे. त्यात आम्ही सफल होताना दिसतोय. कारण आम्ही दंडात्मक कारवाई सोबत जनजागृती चांगल्या पद्धतीने करत आहोत. लोकांचा देखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. गाड्याने आमचे मनोबल नक्कीच वाढले आहे.
– सुषमा मुंढे, DSI, नगररोड-वडगांवशेरी क्षेत्रीय कार्यालय.
—-