PMC Solid Waste Management Department | सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे पुणेकरांना अजून पडणार महागात!   | पुणे महापालिका अडीच ते तीन पटीने दंड वाढवणार

HomeBreaking Newsपुणे

PMC Solid Waste Management Department | सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे पुणेकरांना अजून पडणार महागात! | पुणे महापालिका अडीच ते तीन पटीने दंड वाढवणार

कारभारी वृत्तसेवा Jan 10, 2024 3:06 AM

Phule Smarak Pune | महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील स्मारकांच्या विकास आराखड्यांचा  आढावा
Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे मेट्रोची सेवा तात्काळ विमानतळापर्यंत करा | काँग्रेस आक्रमक
Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | काँग्रेस कडून पुणे लोकसभा समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे!

PMC Solid Waste Management Department | सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे पुणेकरांना अजून पडणार महागात!

| पुणे महापालिका अडीच ते तीन पटीने दंड वाढवणार

PMC Solid Waste Management Department | सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्ता किंवा मार्गावर अस्वच्छता करणे (Unhygienic in Public places), कचरा टाकणे यासाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून (PMC Pune Solid Waste Management Department) दंड आकारला जातो. मागील चार महिन्यात महापालिकेने 1 कोटींचा दंड वसूल केला आहे. दरम्यान आगामी काळात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, अजून महागात पडणार आहे. कारण यासाठी आकारण्यात येत असलेला 180 रुपयाचा दंड वाढवून तो 500 रुपये करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असते. महापालिका सरकार मान्यता देईल या भरवश्यावर नवीन दंडाची अंमलबजावणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)
प्रशासनाच्या प्रस्तावा नुसार घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ चे तरतुदींचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना दंड करण्याचे अधिकार नगरपरिषद / नगर पंचायत यांना शासन निर्णय नुसार देण्यात आले आहेत.  त्यानुसार  पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन कार्यालयांतर्गत सार्वजनिक ठिकाणी / रस्ता / मार्गावर अस्वच्छता करणे याकरिता १८०/- दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुणे शहराचा विस्तार वाढत चाललेला असून वाढती लोकसंख्या त्यातून निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या दैनंदिन कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, त्याची अंमलबजावणी करणे तसेच घनकचरा हाताळणी आणि व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार प्रभावी करणेसाठी शहरातील नागरिकांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. शहरातील जुन्या हद्दीत व नवीन समाविष्ट गावे येथील नागरिक कचरा उघड्यावर टाकत असतात. त्यामुळे क्रोनिक स्पॉट व अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण होते व सदर ठिकाणी पडलेला कचरा उचलून घेण्यासाठी अतिरिक्त मनुष्य बळ वाहतूक खर्च व मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया याकरिता महानगरपालिकेला आर्थिक तोशिष सहन करावी लागत आहे. (PMC Pune News)
प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि, सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर  अस्वच्छता करणे याकरिता सध्या असणारी दंडाची तरतूद अत्यल्प असल्याने नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करण्यामध्ये अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे सदर दंडात्मक रक्कमेमध्ये वाढ करून १८०/- ऐवजी रक्कम ५००/- इतकी दंड आकारणी केल्यास प्रतिबंध सिद्धांतानुसार (theory of Deterrence) नुसार नागरिकांमध्ये अपेक्षित बदल घडून उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होणार आहे. यामुळे अपेक्षित घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी होऊन शहर स्वच्छ व सुंदर राखण्यास मदत होणार आहे. यामध्ये नागरिकांकडून निधी वसूल करणे असे उद्दिष्ट नसून घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे व शहर विद्रुपीकरणास प्रतिबंध करणे असे ध्येय आहे. दंड रक्कम FI31A101 स्वच्छता संकल्प निधी या अर्थाशिर्षाकावर जमा होत असून या रक्कमेचा विनियोग सार्वजनिक स्वच्छतेच्या कामाकरिता केला जातो.
त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समिती आणि मुख्य सभेसमोर ठेवला जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. मात्र सरकार मान्यता देईल या भरवश्यावर नवीन दंडाची अंमलबजावणी करण्याचा मानस महापालिका प्रशासनाचा आहे.