PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने 4 महिन्यात वसूल केला 1 कोटींचा दंड! 

HomeBreaking Newsपुणे

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने 4 महिन्यात वसूल केला 1 कोटींचा दंड! 

कारभारी वृत्तसेवा Jan 01, 2024 1:38 PM

Pune Water cut on Thursday | पुणे शहरात काही भागात  गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद
PMC Pune Assistant Commissioner | महापालिका सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार केला जातोय बदल
PMC Pune Employees | Pay Matrix | पुणे महापालिकेच्या प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध पदांचे वाढणार वेतन!

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने 4 महिन्यात वसूल केला 1 कोटींचा दंड!

| अस्वच्छता करणाऱ्या 24 हजार नागरिकांवर 4 महिन्यात कारवाई

PMC Solid Waste Management Department | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे, अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. विभागाने ही कारवाई गंभीरपणे सुरु केली आहे. 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर 2023  या काळात सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून  1 कोटींचा  दंड वसूल करण्यात आला आहे. तर एकूण वर्षभरात 1 कोटी 66 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी गेल्या चार महिन्यात 24 हजाराहून अधिक तर  वर्षभरात 37 हजाराहून अधिक पुणेकरांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

दंड घेण्याची तरतूद

पुणे महापालिकेने सार्वजनिक जागी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता उपविधी तयार केली आहे. त्या नियमानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांस दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. यासाठी 180 रुपयापासून ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी  महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई सुरु केली आहे. असे कदम यांनी सांगितले. (PMC Pune)

असा केला दंड वसूल

2023 या वर्षभरात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबद्दल 1248 लोकांकडून 12 लाख 48 हजार दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या 858 जणांकडून 1 लाख 81 हजार 670 रुपये वसूल केले. कचरा जाळणाऱ्या 1263 लोकांकडून 7 लाख 9 हजार 100 रु वसूल करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याबद्दल 2064 लोकांकडून 4 लाख 3 हजार रुपये वसूल करण्यात आले. घरगुती कचरा स्वच्छ च्या लोकांना देण्यास नकार देणाऱ्या 381 लोकांकडून 12940 वसूल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या 30129 लोकांकडून 95 लाख 65 हजार रुपये वसूल करण्यात आले. बल्क वेस्ट जनरेटर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद बाबत 53 लोकांकडून 2 लाख 75 हजार वसूल केले. बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या 298 लोकांकडून 14 लाख 65 हजार 650 वसूलण्यात आले. 548 लोकांवर प्लास्टिक कारवाई करत 27 लाख 11 हजार वसूल करण्यात आले. अशा एकूण 37 हजार 152 लोकांवर दंड ठोठावत महापालिकेने 1 कोटी 66 लाख 37 हजार 721 रुपये वसूल केले. (Pune Municipal Corporation)

चांगल्या कामाचे कौतुक होणे गरजेचे

दरम्यान या दंडात्मक कारवाईत काही क्षेत्रीय कार्यालयांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तर काहींनी मात्र अगदीच सुमार काम केले आहे. चांगले काम करण्यात हडपसर क्षेत्रीय कार्यालय, नगर वडगावशेरी, कोंढवा येवलेवाडी, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने खूप चांगल्या पद्धतीने जनजागृती करत दंडात्मक कारवाई केली आहे. तर येरवडा कळस धानोरी, ढोले पाटील रोड, बिबवेवाडी अशा क्षेत्रीय कार्यालयांनी मात्र सुमार काम केल्याचे आढळून येत आहे. या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य असताना देखील इथे म्हणावी तशी कारवाई झाली नाही. दरम्यान क्षेत्रीय कार्यालयाच्या कामात अजून गती येण्यासाठी प्रशासनाकडून चांगल्या कामाबाबत शाबासकी देणे गरजेचे आहे. चांगले काम करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांना बक्षीस द्यायला हवे आहे. तर सुमार काम करणाऱ्या कार्यालयांना तंबी द्यायला हवीय.

शहराबाबत लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे

महापालिकेकडून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जसे प्रयत्न केले जातात, तशाच पद्धतीने पुणेकरांनी देखील प्रशासनाला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. मात्र तेच होताना दिसत नाही. काही नागरिक आणि व्यावसायिक इतस्ततः कचरा फेकत राहतात. त्यामुळे शहरात उघडयावर कचरा फेकण्याच्या प्रमाणात वाढ होत राहते.  अशा लोकांनी शहराला आपलं मानण्याची आवश्यकता आहे. पुणे शहरात राज्य आणि देशभरातून लोक येऊन स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांना शहराविषयी आस्था वाटत नसावी, मात्र ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने शहर स्वच्छ होण्यास सुरुवात होईल.
——
पुणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशपातळीवर पहिल्या 5 क्रमांकात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच भाग म्हणून ही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामुळे कचरा उघड्यावर फेकला जाणार नाही. लोकांमध्ये जनजागृती येईल. हे काम प्रभावीपणे करण्यासाठी आम्ही परिमंडळ निहाय काही अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील केली आहे. दररोज कचरा उचलला जाणे, त्याचे वर्गीकरण होणे, कचरा उघड्यावर फेकला न जाणे, यावर देखरेख करण्याचे काम हे अधिकारी करतील.
संदीप कदम, उपायुक्त्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग. 
—-