PMC Solid Waste Management Department | गणेश विसर्जन मिरवणुकी नंतर केलेल्या स्वच्छता अभियानात ६७ टन कचरा व ३.५ टन चपला बूट केले गोळा!
Pune Ganesh Immersion – (The Karbhari News Service) – सालाबादप्रमाणे २०२४ मधील सार्वजनिक गणेशोत्सव दिनांक ७सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणूक ही दोन दिवस चालली. १८ सप्टेंबर रोजी मुख्य रस्त्यावर व मिरवणूक मार्गावर एकूण ३९७० सफाई सेवकांमार्फत स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानामध्ये १६७ टन कचरा व ३.५ टन चपला बूट कचरा गोळा करण्यात आला. अशी माहिती महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Sandip Kadam PMC)
महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने नेहमीप्रमाणे गणेशोत्सवात खूप चांगली कामगिरी केली आहे. गणेश विसर्जन पुर्ण झालेनंतर त्वरीत स्वच्छता कर्मचारी यांनी प्रमुख विसर्जन मार्गांवर साफसफाईचे काम सुरू केले होते.(PMC Solid Waste Management Department)
गणेशोत्सव २०२४ नियोजन व पर्यावरणपूरक अंमलबजावणी मध्ये पुणे महानगरपालिके बरोबर स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, Cummins India Foundation, जनवाणी, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, Rotaract Club, Lion’s Club, NSCC, Sakal Social Foundation व इतर सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या सर्व यंत्रणाची सविस्तर माहिती www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. गणेशोत्सव २०२४ मध्ये पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात आले होते.
यामध्ये ECOEXIST संस्था, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था व इतर विविध स्वयं सेवी संस्थांमार्फत गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून त्याचा पुर्नवापर केला जाणार आहे. शाडू माती एक मर्यादित संसाधन असून या मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे गाळ निर्माण होऊन नदीपात्रात गाळ साठल्याने सागरी जीवनावर परिणाम होतो. या शाडू मातीचा पुर्नवापर केल्यास मूर्तीकारांना मूर्ती/माती परत देऊन त्याचा पुर्नवापर होणार आहे. पुनरावर्तन उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती व शाडू माती संकलनाच्या केंद्राविषयीची सविस्तर माहिती www.punaravartan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती.
• निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मुर्त्या किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. हे प्रासादिक निर्माल्य एकत्र करून त्याचे खत बनवून शेतक-यांना देण्यात येते, म्हणूनच या प्रासादिक निर्माल्याचे पावित्र्य भंग पावेल अशा
कुठल्याही वस्तू किंवा इतर कचरा निर्माल्यात टाकू नये असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले होते.
• क्षेत्रिय कार्यालयांमार्फत संकलित केलेल्या गणेश मूर्तीचे पुर्नविसर्जन करणेची व्यवस्था वाघोली येथील खाणीमध्ये तीन पाळ्यांमध्ये आवश्यक सेवक व पर्यवेक्षकीय अधिकारी
नेमून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आली होती.
सर्व क्षेत्रिय कार्यालयांना गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात सर्वत्र सार्वजनिक स्वच्छता राखली जाण्याच्या अनुषंगाने सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, ओपन प्लॉट, क्रॉनिक स्पॉट, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर या सर्व ठिकाणी स्वच्छता राखणेबाबत सूचित करण्यात आले होते.
वाघोली येथील खाणीच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयाकडून व सुरक्षा विभागाकडून रखवालदारांची नियुक्ती करण्यात आली होती. क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार आवश्यक गाड्यांची उपलब्धता मोटार वाहन विभागाकडून करण्यात आली. या गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन सन्मानपूर्वकरित्या वाघोली
येथील खाणीमध्ये करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मा. पोलीस आयुक्त तसेच मा. पोलीस अधिक्षक, पुणे
ग्रामीण तसेच यांना कळविण्यात आले होते.
पुणे महानगरपालिकेमार्फत अग्निशामक दलाची सुसज्ज यंत्रणा ठेवण्यात आली होती तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत योग्य ते नियोजन करण्यात आले होते.
वाघोली येथे खाणीमध्ये गणेशमुर्त्याचे पुर्नविसर्जन करणेबाबत परिमंडळ निहाय गणेशमुर्त्याचे पुर्नविसर्जन करण्यात आले.
.
पुणे महानगरपालिकेमार्फत गणेशोत्सव कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार ४०० मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आले होते.
COMMENTS