PMC Social Devlopment Department | महापालिका आयोजित दिव्यांग मेळाव्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींचा सन्मान!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागामार्फत पुणे शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मेळावा आज आयोजित करणेत आला होता. पुणे महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग घटकांतर्गत दिव्यांगत्वावर मात करून विशेष व्यवसाय करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती, दिव्यांगांचे व्यवसाय गट, सामाजिक उपक्रम राबविणारे दिव्यांगाचे बचत गट, उत्कृष्ट प्राविण्यप्राप्त खेळाडू, पुणे महानगरपालिका आदर्श दिव्यांग कर्मचारी, उत्कृष्ट दिव्यांग कलापथक या अंतर्गत 36 गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच दिव्यांग कलाकारांचा ‘तिमिरातून तेजाकडे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. (International Day of Persons with Disabilities)
मेळाव्याप्रसंगी अरविंद माळी, उप आयुक्त यांनी स्वागत केले. रामदास चव्हाण, मुख्य समाज विकास अधिकारी, समाज विकास विभाग यांच्यामार्फत पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागाकडील दिव्यांग योजनांची माहिती देणेत आली. तसेच नंदकुमार फुले, निवृत्त जनरल मॅनेजर, महाराष्ट्र राज्य, दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ कायदे विषयक मार्गदर्शन करण्यात आले. १) समर्थनम् ट्रस्ट प्रतिनिधी, २) युथ फॉर जॉब संस्था प्रतिनिधी, ३) सिफार प्रतिनिधी यांच्यामार्फत रोजगार विषयक मार्गदर्शन व दिव्यांगांसाठीच्या योजना विषयी माहिती देण्यात आली. पुणे महानगरपालिका दिव्यांग थेरपी सेंटर (उमंग इन्स्टिट्यूट) बालेवाडी विषयी माहिती सादरीकरण डॉ. मानसी ठक्कर, उमंग इन्स्टिट्यूट, बाणेर यांच्यामार्फत करण्यात आले. प्रदर्शनाच्या ठिकाणी दिव्यांग बचत गट तसेच दिव्यांग संस्था यांचे 11 स्टॉल लावणेत आले होते.

महेश पाटील, आयुक्त, दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी महेश पाटील, आयुक्त, दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य, अरविंद माळी, उप आयुक्त, पुणे महानगरपालिका, संचेती हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी कर्नल नवनिश त्यागी, रामदास चव्हाण, मुख्य समाज विकास अधिकारी, समाज विकास विभाग, नंदकुमार फुले, निवृत्त जनरल मॅनेजर, महाराष्ट्र राज्य, दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ, समर्थनम् ट्रस्ट प्रतिनिधी, युथ फॉर जॉब संस्था प्रतिनिधी, सिफार प्रतिनिधी, डॉ. मानसी ठक्कर, उमंग इन्स्टिट्यूट, बाणेर, समाज विकास विभागाकडील अधिकारी व कर्मचारी, दिव्यांग समन्वय समिती सदस्य, बाबासाहेब राऊत, रफिक खान, पन्नालाल निकम, सुजित गोयर, श्री. राजेंद्र जोग, पुणे शहरातील दिव्यांग संस्था, संघटना प्रतिनिधी व दिव्यांग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS