PMC Sky Sign Department | Mumbai Hoarding Collapse | अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश | मुंबईच्या घटनेवरून पुणे महापालिका आयुक्तांच्या सूचना 

HomeBreaking Newsपुणे

PMC Sky Sign Department | Mumbai Hoarding Collapse | अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश | मुंबईच्या घटनेवरून पुणे महापालिका आयुक्तांच्या सूचना 

गणेश मुळे May 14, 2024 1:55 PM

Finally, action was taken on the controversial hoarding erected in front of the Pune Municipal Corporation (PMC)!
Dr Rajendra Bhosale IAS | पुणेकर नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महापालिका तयार करणार धोरण!
Rain in Dhanori | महापालिका आयुक्तांकडून धानोरी भागातील नाले आणि पावसाळी लाईनची पाहणी!

PMC Sky Sign Department | Mumbai Hoarding Collapse | अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश | मुंबईच्या घटनेवरून पुणे महापालिका आयुक्तांच्या सूचना

Mumbai Hoarding Accident – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत (PMC Sky Sign Department) पुणे शहर हद्दीत जाहिरात फलक ( होर्डींग्ज) उभारण्यास परवानगी देण्यात येते. काल मुंबई येथे झालेल्या (होर्डिंग) दुर्घटनेच्या अनुषंगाने पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी परवाना व आकाशचिन्ह विभागाचा आढावा घेऊन सूचना दिलेल्या आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
त्यामध्ये येणाऱ्या पावसाळ्याच्या अनुषंगाने सर्व अधिकृत जाहिरात फलकांचे structure stability रिपोर्ट नुसार त्यांचे ऑडीट करणे. जे जाहिरात फलक defective असतील त्यावर कारवाई करणे, अवकाळी पाऊस वारा यामध्ये एकही जाहिरात फलक कोसळणार नाही, याअनुषंगाने दक्षता घेणे. तसेच महापालिका हद्दीत एकही अनधिकृत जाहिरात फलक शिल्लक राहणार नाही याची दक्षता घेणेस व अनधिकृत जाहिरात फलक आढळून आल्यास याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित उपआयुक्त परिमंडळ यांची राहील. याबाबत सूचना दिलेल्या आहेत. (Pune PMC Hoarding)
त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेशित केलेले आहे व त्याबाबतचा अहवाल संबंधितांकडून २ दिवसांत घेण्याच्या सूचना उप आयुक्त परवाना व आकाशचिन्ह विभाग यांना दिलेल्या आहेत.
सर्व  सहाय्यक आयुक्त यांना यापूर्वी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची माहिती सादर करावी. जाहिरात धारकाने दिलेल्या जाहिरात फलकांपैकी पाच टक्के जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट आपल्याकडील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे मार्फत करणेबाबत यापूर्वी सर्वांना सूचना देण्यात आलेले आहेत.

सर्व सहाय्यक आयुक्त यांना यापूर्वी सूचना देण्यात आलेली आहे. तरी देखील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बोर्ड बॅनर मोठे बांबूचे पहाड असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर धोकाही होण्याचा संभव आहे. कालची मुंबई येथील झालेली घटना लक्षात घेता त्याचप्रमाणे रोज येणारा वादळ वारा याच्या अनुषंगाने आज पूर्ण वेळ कारवाई करून शहरातील सर्व बोर्ड बॅनर, अनधिकृत होर्डिंग त्याचप्रमाणे बोर्ड लावण्यासाठी बांधण्यात आलेले पहाड इत्यादी काढून घेऊन जप्त करण्यात यावेत. त्याचप्रमाणे ज्या मांडव वाल्याने सदरचे पहाड उभे केले आहेत, त्याचे वर पोलिसांच्या मदतीने गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर कारवाई करत असताना पोलिसांची मदत घेण्यात यावी. असे आदेशात म्हटले आहे.

– शहरात 85 अनधिकृत होर्डिंग!

महापालिका आकाशचिन्ह विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात एकूण 85 अनधिकृत फलक आहेत. तर 2598 अधिकृत फलक आहेत. विभागाकडून 1564 अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर  structure stability रिपोर्ट प्राप्त झालेले 2249 फलक आहेत.