PMC Services For Students | 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेस साठी, सीईटी परीक्षेसाठी पुणे महापालिकेकडून आर्थिक सहायता! | जाणून घ्या विविध योजना
| 10 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार
PMC Services For Students | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेस (Coaching Classes)!साठी, सीईटी परीक्षेस (CET exam) बसण्यासाठी तसेच उच्च व्यावसायिक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य (Financial Assistance) देण्यात येते. या चार योजनांसाठी पुणे महापालिकेच्या (PMC Pune) वतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. त्यासाठी 10 जुलै पासून 30 सप्टेंबर पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या (PMC Social Devlopment Department) वतीने करण्यात आले आहे. (PMC Services For Students)
महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना या योजनांअंतर्गत युवक, युवती, महिला, पुरुषांकडून खालील योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (Pune Municipal Corporation News)
या आहेत योजना
1. इ. १० वी तील विद्यार्थ्यांसाठी खासगी
क्लाससाठी अर्थसाह्य – इ. ९ वी मध्ये ५०% वा त्या पेक्षा अधिक गुण मिळाले असल्यास व वाल्मिकी समाजातील ४५% वा त्या पेक्षा अधिक गुण मिळालेल्या
क्लाससाठी अर्थसाह्य – इ. ९ वी मध्ये ५०% वा त्या पेक्षा अधिक गुण मिळाले असल्यास व वाल्मिकी समाजातील ४५% वा त्या पेक्षा अधिक गुण मिळालेल्या
विद्यार्थ्यांना इ. १० वीमध्ये प्रवेश घेतला असल्यास खासगी क्लाससाठी अर्थसाह्य देण्यात येते.
2. इ. १२ वी तील विद्यार्थ्यांसाठी खासगी
क्लाससाठी अर्थसाह्य – सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात इ. १२ वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना (इ. ११ वीत ६०% वा त्यापेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक) खासगी क्लासकरिता अर्थसाह्य देण्यात येते. फक्त
क्लाससाठी अर्थसाह्य – सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात इ. १२ वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना (इ. ११ वीत ६०% वा त्यापेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक) खासगी क्लासकरिता अर्थसाह्य देण्यात येते. फक्त
कॉमर्स व शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावेत.
3. सी.ई.टी. परीक्षेस बसण्यासाठी अर्थसाह्य- सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात इ. १२ वीत प्रवेश
घेतलेल्या विद्यार्थ्यांना सी.ई.टी. परीक्षेकरिता प्रवेश शुल्कासाठी अर्थसाह्य देण्यात येते. इ. ११ वीत ६०% वा त्यापेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक.
4. उच्च व्यावसायिक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसाह्य – वैद्यकीय, इंजिनिअरिंग, व्यवस्थापन, संगणकीय इ. शाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमास शासनमान्य शिक्षण
संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना (मागील वर्षी ६० टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक) शैक्षणिक अर्थसाह्य देण्यात येते. (PMC Pune News)
या योजनांचे अर्ज १० जुलै २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.punecorporation. org या संकेतस्थळावरती (PMC Website) भरण्यात यावेत.
तसेच या बाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या
संकेतस्थळावरती बघण्यात यावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. (PMC Services)
संकेतस्थळावरती बघण्यात यावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. (PMC Services)
—
News Title | PMC Services For Students | Financial assistance from Pune Municipal Corporation for private classes for 10th, 12th students, for CET exam! | Know different plans